पंढरपूर जवळ ट्रकआणि बसचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक प्रवासी गंभीरित्या जखमी झाले आहेत. हा अपघात भटुंबरे गावाजवळ झाला. अपघात घडताच प्रत्यक्षदर्शींनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, भटुंबरे गावाजवळ भाविकांची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या आणि ट्रकच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात दोन भाविकांना प्राण गमवावे लागले. अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावा नजीक अपघात झाला. नंदनी ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या माल ट्रकची जोरदार धडक झाली.
यामध्ये यामध्ये दोन्ही वाहनांची मोठे नुकसान झाले असून बस मधील बेबाबाई महाळसकर वय (५५) व जनाबाई महाळसकर( वय ७) यांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी 12 जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.