सुरेश धसांनी प्राजक्ता माळी अन् रश्मिकाचं नाव घेताच गुणरत्न सदावर्तेंचा पारा चढला, म्हणाले, ‘अर
Marathi December 29, 2024 08:24 PM

Gunaratna Sadavarte on Prajakta Mali, Mumbai : भाजप आमदार सुरेश धस (सुरेश धस) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करत असताना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (रश्मिका मंदान्ना) आणि प्राजक्ता माळीचं (प्राजक्ता माळी) नाव घेतलं होतं. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं होतं. मात्र, सुरेश धस यांनी मी माफी-बिफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली होती. दरम्यान, आता सुरेश धस यांच्या वक्तव्यावरुन वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाशी बोलत असताना गुणरत्न सदावर्तेंनी (गुणरत्न सदावर्ते) सुरेश धस यांच्यासह बीडमध्ये (बेड) काढण्यात आलेल्या मोर्चावरही टीका केलीये.

गुणरत्न सदावर्ते काय काय म्हणाले?

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एक अत्याचारी व्यवस्था आहे. त्या चष्म्यातून पाहण्याची सवय झालेली असती. पुरुष प्रधान विचाराची मुलं आहे. ही धसांसारखी फळं आहेत. तुम्ही एखाद्याला न्याय मिळण्याची भाषा करतात. पण दुसरीकडे तुम्ही अभिनेत्रीला लज्जा उत्पन्न व्हावी, अशी भाषा करता. एकच नाही, दाक्षिणात्य अभिनेत्री आहे, उत्तर भारतातील अभिनेत्री देखील आहे. वंदनीय आणि पुजनीय भगवानबाबा यांच्याही वेदना आम्ही विसरु शकत नाही.

महिला आयोगाने त्यांना वार्निंग दिली पाहिजे – गुणरत्न सदावर्ते

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, अरे बाबा धस दोन आठवडे झाले नसतील आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर असं कृत्य करणे. हे जीभ घसरली म्हणून नाही तर हे मुद्दामहून आहे. महिला आयोगाने त्यांना वार्निंग दिली पाहिजे. त्यांना दंड ठोठावण्यात आला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्या महिलेची टर उडवणे, हे तिच्या अब्रूचे नुकसान आहे. जुन्या आणि नव्या कायद्यानुसार धसांना शिक्षा होऊ शकतो. सभापती महोदय सुद्धा त्यांना शिक्षा देऊ शकतात. एखाद्या महिलेप्रती केलेला हा अपमान आहे. हे धसांना कोण शिकवणार आहे. धसांना सामान्यांच्या जमिनीची मोजू वाटतात. माझ्या वंजारी भावांच्या जमिनी मोजल्या जातात. सराटीमध्ये बसलेल्याची लोक रेती काढून नेतील.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.