संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती या तीन दिवस बंद
GH News December 31, 2024 07:11 PM

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली.त्यानंतर राज्यात या प्रकरणात अनेक स्वरुपाची आंदोलने सुरु आहेत. उद्या मस्साजोग ग्रामस्थ सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत. तर राज्यातील वाशिम, यवतमाळ, गोंदियातील २,२३९ ग्रामपंचायती तीन दिवसांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे.यवतमाळमधील १ हजार २०५ ग्रामपंचायती बंद असणार आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती बंद असणार आहेत आणि गोंदियातील ५४३ ग्रामपंचायतींना तीन दिवसांचे काम बंद आंदोलन केले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी जर ग्रामपंचायती बंद करण्याची वेळ येत असेल सरकारचा काय उपयोग असा सवाल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आरोपीच्या जवळची माणसं सरकारमध्ये आहेत, त्यामुळे कारवाई करता येत नाही असे तुम्हाला वाटत आहे का? या प्रकरणात तर तुमचा भाऊ असता त्यांच्यावर असा प्रसंग आला असता तर काय केले असते असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.