नवीन वर्षाचं स्वागत करताना आणि 2024 या वर्षाला निरोप देताना अनेकांनी सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहिले आहेत. काहींनी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत वर्षभरातील खास आठवणींना उजाळा दिला आहे. याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित सर्वांचं लक्ष वेधलंय. या पोस्टमध्ये त्याने थेट पूर्व पत्नी नताशा स्टँकोविकचं नाव घेतलं नाही. परंतु अप्रत्यक्षपणे तिचा उल्लेख केला. लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे. हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज ऐकू येतोय. “पाहता पाहता एक वर्ष सरलं. काही नवीन गोष्टी, नवीन शिकवण्या, नवीन अनुभव देऊन गेला”, असं त्यात ऐकायला मिळतंय.
“काही जुन्या लोकांनी साथ सोडली. काही नवीन लोकांनी हात धरला. कसं म्हणून की फक्त हे वर्ष सरलं. जाता जातासुद्धा या वर्षाने खूप काही शिकवलंय”, असा आवाज या व्हिडीओत ऐकायला मिळालं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिलंय, ‘मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षी मला बरेच चढउतार पहायला मिळाले. सोबतच अशी एक शिकवण मिळाली जी मी आपल्यासोबत पुढे घेऊन जातोय. माझ्या आयुष्यात जे काही आलं, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. नवीन वर्षात आशावाद, दृढ संकल्प आणि प्रेमासोबत पुढे जातोय. माझ्या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी धन्यवाद आणि मी नवीन वर्षांत तुम्हाला भेटीन.’
हार्दिक पांड्याचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलंय. त्याची लव्ह-स्टोरीसुद्धा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. नताशासोबत त्याची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. हार्दिकने 1 जानेवारी 2020 रोजी एका क्रूझवर नताशाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी नताशा प्रेग्नंट होती. त्यानंतर जुलै 2020 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या तीन वर्षांनंतर हार्दिक आणि नताशाने उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं. मात्र त्याच्या काही महिन्यांतच दोघांनी घटस्फोट जाहीर करत सर्वांना धक्का दिला.