Parbhani Crime :परभणीच्या पारवा शिवारामधील शेत आखाड्यावर दरोडेखोरांनी हैदोस घातलाय. दरोडेखोरांनी या आखाड्यावर राहणाऱ्या कुटुंबाला जबर मारहाण करत एका महिलेवर सामूहिक अत्याचार केलाय. तसेच सोन्या-चांदीचे दागिने ही लंपास करून हे दरोडेखोर पसार झाले आहेत. यात 2 जण गंभीर असून त्यांच्यावर खासगी तर पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिकची माहिती अशी की, परभणीतील पारवा आणि जांब या दोन्ही गावांच्या मधोमध एक शेत आखाडा आहे. या ठिकाणी पीडित महिला,पती आणि सासू असे तीन जण वास्तव्यास आहेत.गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही दरोडेखोरांनी या आखाड्याला लक्ष करत पार हैदोस घातला. सदर महिलेच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले सासूलाही मारहाण करण्यात आली.
पीडित महिलेजवळील जवळपास 4 तोळे सोने व 20तोळे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले व आखाड्यावरील एका खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले.घटना कळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान पीडित महिलेचे पती आणि सासू गंभीर जखमी असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,तर पीडित महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून स्वतः नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप ही परभणीत दाखल झाले असून दरोडेखोर यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..