4,4,4,4, जयस्वालची दुसऱ्या डावात ‘यशस्वी’ सुरुवात, स्टार्कला पहिल्याच ओव्हरमध्ये धुतला, पाहा व्हीडिओ
GH News January 04, 2025 02:09 PM

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 185 धावा केल्या. अपवाद वगळता टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर इतरांनी छोटेखानी खेळी करत भारताला 185 धावांपर्यंत पोहचवलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जीव ओतला. कांगारुंना 181 वर गुंडाळत 4 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाकडून केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वीने पहिल्याच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क याची धुलाई करत पिसं काढली. स्टार्कची पहिल्याच ओव्हरमध्ये अशी स्थिती क्वचित वेळाच झाली असेल.

4 चौकार आणि 16 धावा

यशस्वीने स्ट्राईक घेतली. मिचेलने पहिला बॉल टाकला. यशस्वीने पहिला बॉल डॉट केला. यशस्वीने त्यानंतर चौकारांची हॅटट्रिक केली. यशस्वीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर चौकार ठोकले. यशस्वीने ठोकलेल्या या सलग 3 चौकारांमुळे मिचेल स्टार्कचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्यानंतर स्टार्कने पाचवा बॉल डॉट टाकला. मात्र यशस्वीने परत एकदा ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला. यशस्वीने अशाप्रकारे टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 16 धावा करुन देत चांगली सुरुवात मिळवून दिली. यशस्वीच्या या 16 धावांमुळे स्टार्कवरही दबाव तयार करता आला. यशस्वीने एकाच षटकात ठोकलेल्या या 4 चौकारांचा व्हीडिओ स्टार स्पोर्ट्सकडून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चौकारांच्या हॅटट्रिकसह 4 चौकार

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.