मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी गावच्या हद्दीत रविवारी (ता. ५) दुपारी १ च्या सुमारास कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली.
या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घिवाला (दोघेही रा. सुरत, गुजरात) अशी मृतांची नावे आहेत.
मुंबईकडून गुजरातकडे निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या खाली उतरून खड्ड्यात कोसळली. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहन खड्ड्यात पडल्यानंतर दोन ते तीन वेळा उलटून ५० मीटर लांब गेले.
अपघातात गुजरातमधील सुरत येथील रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घिवाला यांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी काम अर्धवट असल्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.