ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे. टीम इंडिया पुढील काही दिवस रिलॅक्स मोडवर आहे. टीम इंडिया नववर्षात मायदेशात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. इंग्लंड नववर्षात भारत दौरा करणार आहे. इंग्लंड या भारत दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेने करणार आहे. इंग्लंडने या मालिकेसाठी काही दिवसांआधीच संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार जॉस बटलर हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे.मात्र टीम इंडियात टी20i मालिकेसाठी कुणाला संधी मिळणार? याची उत्सुकता सर्वांना आहे.
अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच संजू सॅमसनचाही दावा मजबूत आहे. संजूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत विस्फोटक बॅटिंग केली होती. त्यामुळे या तिघांनाही संधी मिळाल्यास नक्की ओपनिंग कोण करणार आणि कुणाला तिसऱ्या स्थानी बॅटिंग करावी लागणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवचा चांगलाच कस लागणार आहे.
तिलक वर्माने गेल्या मालिकेत सलग 2 शतकं करत धमाका केला. तसेच हार्दिक पंड्या आणि रिंकु सिंह या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. तसेच अक्षर पटेलकडून बॅटिंगसह बॉलिंग अपेक्षित असणार आहे. तसेच अमरावतीकर जितेश शर्मा याला पर्यायी विकेटकीपर म्हणून संधी मिळू शकते. तसेच निवड समिती ईशान किशनबाबत विचार करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. तसेच रमनदीप सिंह याला संधी मिळणार का? याच्याकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक लक्ष असेल.
वेगवान आणि फिरकी गोलंदाजाची जबाबदारी ही अर्शदीप सिंह, यश दयाल, हर्षित राणा याच्यांवर असेल. यांना अनुभवी हार्दिक पंड्याची असेल. तसेच अक्षर पटेलसह रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी त्रिकुटाचा समावेश केला जाऊ शकतो.
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रमनदीप सिंह आणि यश दयाल.