अधिकारी बदलला तरी नागरिकांना थेट मागता येईल मोबाईल नंबरवरुन मदत! अधिकारी अधिकार्यांना आता पर्मनंट मोबाईल
esakal January 08, 2025 02:45 PM

सोलापूर : महिला, तरुण-तरुणींसह प्रत्येक घटकाला पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यावर काहीवेळात मदत मिळावी, यासाठी आता जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस ठाण्यांमधील महिला शाखा, निर्भया पथकास शासकीय मोबाईल दिले जाणार आहेत. त्यामुळे अधिकारी बदलला, तरी नागरिकांना त्याच मोबाईल क्रमांकावरुन मदत मिळविता येणार आहे.

पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सामान्य नागरिक त्यांच्या तक्रार व मदतीसाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतात. पण, ठरावीक कालावधीनंतर पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर त्यांच्याकडील मोबाईल क्रमांक त्यांच्यासोबत जातो. त्यामुळे सामान्यांना अधिकाऱ्यांशी संपर्क करायला अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी शासकीय मोबाईल खरेदी करुन त्यात कायमचा क्रमांक घालून पोलिस ठाण्यात ठेवले जाणार आहेत. त्यामुळे अधिकारी बदलला, तरी क्रमांक तोच राहणार असल्याने नागरिकांना अधिकाऱ्यांशी संपर्क करायला सोयीचे होणार आहे.

नागरिकांसाठी ‘हे’ मोबाईल क्रमांक उपलब्ध

पोलिस अधीक्षक (९११२२२६३१०), अपर पोलिस अधीक्षक (९११२२२६३११), अक्कलकोट पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३१२), अक्कलकोट उत्तर पोलिस निरीक्षक (९११२२२६३१४), अक्कलकोट दक्षिण पोलिस निरीक्षक (९११२२२६३१६), वळसंग सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३१७), सोलापूर ग्रामीण पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३१८), सोलापूर तालुका पोलिस निरीक्षक (९११२२२६३२०),

मंद्रुप सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३२१), कामती सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३२२), मोहोळ पोलिस निरीक्षक (९११२२२६३२३), बार्शी पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३२४), पोलिस निरीक्षक बार्शी शहर (९११२२२६३२५), बार्शी तालुका सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२५३२४), वैराग पोलिस निरीक्षक (९११२२२६३२७), पांगरी सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३२८), माढा सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३२९), करमाळा पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३२८), करमाळा पोलिस निरीक्षक (९११२२२६३३१), टेंभूर्णी पोलिस निरीक्षक (९११२२२६३३२), कुर्डुवाडी पोलिस निरीक्षक (९११२२२६३३४),

अकलूज पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३३५), अकलूज पोलिस निरीक्षक (९११२२२६३३६), माळशिरस पोलिस निरीक्षक (९११२२२६३३७), सहायक पोलिस निरीक्षक नातेपुते सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३३८), वेळापूर सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३३९), पंढरपूर पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३४०), पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक (९११२२२६३४१), पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक (९११२२२६३४२), पंढरपूर ग्रामीण पोलिस निरीक्षक (९११२२२६३४३), करकंब सहायक पोलिस निरीक्षक (९११२२२६३४४), मंगळवेढा पोलिस उपअधीक्षक (९११२२२६३४५), मंगळवेढा पोलिस निरीक्षक (९११२२२६३४६),

सांगोला पोलिस निरीक्षक (९११२२२६३४७), गुन्हे शाखा (९११२२२६३५६), ‘डीएसबी’ पोलिस निरीक्षक (९११२२२६३५७), निर्भया पथक, सोलापूर (९११२२२६३४८), अक्कलकोट निर्भया पथक (९११२२२६३४९), बार्शी निर्भया पथक (९११२२२६३५०), करमाळा निर्भया पथक (९११२२२६३५१), पंढरपूर निर्भया पथक (९११२२२६३५२), मंगळवेढा निर्भया पथक (९११२२२६३५३), अकलूज निर्भया पथक (९११२२२६३५४), महिला शाखा (९११२२२६३५५).

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.