बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खान ( Farah Khan) आज (9 जानेवारी )ला 60 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक कलाकारांना डान्स शिकवला आहे. फराह खान ही उत्तम कोरियोग्राफर आहे. तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फराह खान एक उत्तम होस्ट देखील आहे. कोरियोग्राफर आणि होस्टिंगमधून ती कोटींची कमाई करत आहे.
ही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखिका आहे. तिचे आजवर अनेक चित्रपट हिट झाले आहेत. सध्या फराह खान 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्ये होस्टिंग करताना पाहायला मिळत आहे. फराह खानच्या डान्सवर मायकल जॅक्सनचा खूप प्रभाव होता. फराह खानने 'जीता वही सिकंदर'ची अनेक गाणी कोरिओग्राफ केली आणि तिने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केली. वडिलांचे आजाराने निधन झाल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एकेकाळी फराहने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.
फराह खान संपत्तीफराह खानकडे लग्जरी गाड्या आणि आलिशान घर आहे. तसेच ती अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे. , होस्टिंग, लेखिका आणि दिग्दर्शक या सर्वांतून ती कोटींची कमाई करतो. फराहचे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फराह खानची एकूण (Net Worth) 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ती गाणी कोरिओग्राफ करण्यासाठी लाखो रुपये घेते. तसेच तिचे एक प्रोडक्शन फाऊस आहे.
फराह खानने दिग्दर्शित केलेला ओम शांती ओम हा चित्रपट खूप गाजला होता. तसेच फराह खान अनेक डान्स शो जज देखील करते. यात 'नच बलिए' चा समावेश आहे. फराह खानने शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांची गाणी करिओग्राफ केली आहे. तिने आपल्या स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे.