Bhoom News : भूम तालुक्यासह परिसरात खवा व पेढा उत्पादनासाठी होणारी वृक्षतोड थांबवण्याची मागणी
esakal January 12, 2025 04:45 AM

धनंजय शेटे

भूम : खवा उत्पन्नासाठी पुढील काही महिन्यात भूम तालुक्यासह परिसरात १०० दिवसांमध्ये पाच लाख वृक्षतोड होत असून ही वृक्षतोड वाचवण्यासाठी मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांना विनोद जोगदंड खवा क्लस्टर चे प्रमुख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. धाराशिव जिल्हा मध्ये खवा व पेढा निर्मितीची शंभर वर्षांपासूनची परंपरा आहे. सदरील खवा उत्पादनासाठी यावर्षी जी आहे मानांकन पण भेटलेले आहे .खवा व पेढा निर्मितीसाठी आज पर्यंत सद्यस्थितीमध्ये वृक्षतोड करून खावा व पेढा निर्मिती केली जात आहे.

सदरील वृक्षतोड बंद व्हावी या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यामध्ये खवा क्लस्टर भूमी यांनी मागील बऱ्याच वर्षापासून संशोधन करून खवा व पेढा निर्मिती करण्यासाठी इंडक्शन मशीनद्वारे सोलर वरती खवा निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. व तो यशस्वी पण झालेला आहे. परंतु खवा क्लस्टर भूमी यांनी व सर्व सामान्य उत्पादकांना येणाऱ्या अडचणीमध्ये सर्वात मोठी अडचण वीज कनेक्शन घेत असताना त्या ठिकाणी इंडस्ट्रियल टेरिफच्या माध्यमातून वीस जोडणे दिली जाते.

त्यामुळे महावितरण चे मॅक्झिमम डिमांड,फिक्स चार्जेस (MD charges )हे जास्त असल्यामुळे खावा उत्पादकांना ती वीज जोडणी परवडत नाही. त्यामुळे त्याकडे खवा उत्पादक शेतकरी आकर्षित झालेले नाहीत. लाकूडतोड करून पारंपारिक भट्टीवरती खवा व पेढा निर्मिती झाल्यामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते .तसेच पर्यावरण व स्वच्छतेबाबत ही दुष्परिणाम निर्माण होतात .सदरील खवा उत्पादनासाठी सोलर वरती इंडक्शन मशीन बनवलेली आहे. सदरी मशीन ही मल्टीपर्पज उपयोगासाठी असून त्यामध्ये दुधापासून खवा,पनीर ,तूप ,बासुंदी,उसापासून गुळवडी,काकवी,सोयाबीन पासून सोया पनीर,सोया दूध तयार करणे अशा प्रकारे मल्टीपर्पज मशीन तयार केलेली आहे.

परंतु सदरील एक मशीन चालवण्यासाठी २५ किलोवॉटचे इंडस्ट्रियल टेरिफ मध्ये वीज कनेक्शन घ्यावे लागते .त्याचे फिक्स चार्जेस (MD charges )मोठ्या प्रमाणात भरावे लागतात .त्यामुळे लोकांचा सदरील मशीन द्वारे उद्योग करण्याकडे कल दिसून येत नाही. कुक्कुटपालन उद्योगाला ज्या पद्धतीने एग्रीकल्चर अँड आदर या टेरिफ मध्ये वीज कनेक्शन दिले जाते .त्या पद्धतीने जर सदरील सोलर इंडक्शन खवा मशीन वरती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज जोडणी दरवर्षी होणारी पाच लाख वृक्षतोड कमी होऊन पर्यावरचा ऱ्हास ही होणार नाही.

शंभर दिवशीय उपक्रमामध्ये सदरील छोटे खावा उत्पादक शेतकरी व व्यावसायिक यांना ॲग्रीकल्चर टेरिफ मध्ये वीज कनेक्शन देण्याचा निर्णय घेतल्यास कायमस्वरूपी ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल तसेच पर्यावरणाचा ऱ्हास ही होणार नाही. वपर्यायाने आर्थिक सुबत्ता निर्माण होईल. तसेच ग्राहकांनाही उच्च प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार खावा ,पेढा ,गुळ, काकवी ,तूप खाण्यासाठी उपलब्ध होईल.सद्यस्थितीमध्ये सदरली व्यवसायातून वीस ते पंचवीस हजार दूध खवा व पेढा उत्पादक यांना रोजगार मिळत आहे .सदरील वीज टेरिफ मध्ये बदल झाल्यास ४० ते ५० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

१०० दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पाच लाख वृक्षतोड होत आहे ती तात्काळ निर्णय घेऊन थांबवल्यास त्याचे दूरगामी चांगले परिणाम दिसून येतील व दरवर्षी होणारी वृक्षतोड कत्तल थांबून पर्यावरणाचे हानी थांबेल व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती मध्ये वाढ होईल .

विनोद जोगदंड निर्मल मिल्क प्रॉडक्ट असोसिएशन खवा क्लस्टर प्रमुख भूम

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.