मोक्का कायद्यात शिक्षा काय आहे?
esakal January 12, 2025 04:45 AM
santosh deshmukh murder case संतोष देशमुख खून प्रकरण

बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सात आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे

walmik karad वाल्मिक कराड

वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये असल्याने त्याच्यावर अद्याप मोक्का लागलेला नाही

vishnu chate विष्णू चाटे

विष्णू चाटेसह सुदर्शन घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार यांच्यावर मोक्का लागला आहे

sudarshan ghule सुदर्शन घुले

खंडणी, अपहार, खून, हप्ते वसुली, सुपारी देणे, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोक्का लागतो.

मोक्का

मोक्का लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं आवश्यक आहे.

दोनपेक्षा जास्त गुन्हे

टोळीतल्या आरोपींवर दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे.

शिक्षेची तरतूद

मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना सहा महिने जामीन मिळत नाही. आरोपींना पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे

जन्मठेप

पाच वर्षे ते जन्मठेप; अशी शिक्षा मोक्का कायद्यात आहे. याशिवाय पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे

मालमत्ता जप्ती

मोक्का कायद्यांतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होते. भारतीय दंड संहितेच्या कलमांखील ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.