ग्वाल्हेरमध्ये मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात ५ महिलांसह ९ जणांना अटक
Junnar News: ओतूर वनविभागाकडून जखमी तरसास जीवदानजुन्नर येथील वनविभागाकडून अंदाजे ६ ते ७ वर्ष वयाच्या जखमी तरसाचे रेस्क्यू (बचाव ) करून त्यास जीवदान दिले असल्याची माहिती वनक्षेत्रापाल लहु ठोकळ यांनी दिली.
Earthquake News: जपानमधील क्युशू भागात ६.६ तीव्रतेचा भूकंपजपानमधील क्युशू भागात ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
Mohali News: मोहालीतील एसएएस नगरमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळलीमोहालीतील एसएएस नगरमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे.
पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शनसदानंदाचा येळकोट हा जयघोष करत एक लाख भाविकांनी पहिल्या दिवशी खंडोबा देवाचे दर्शन घेतले.पौष पौर्णिमेनिमित्त नागापूर(ता.आंबेगाव )येथील श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला सोमवार (ता.१३) उत्साहात प्रारंभ झाला.
CM Fadnavis Live: मुख्यमंत्र्यांचा तपास यंत्रणांना फोनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड सरपंच खून प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना फोन लावून तपासाचा आढावा घेतला.
Bihar Live: जनसुराज्य पक्षाचे कार्याध्यक्ष मनोज भारती राज्यपालांच्या भेटीलाबिहारमध्ये जनसुराज्य पार्टीचे कार्याध्यक्ष मनोज भारती यांच्या नेतृत्वाखाली बीपीएससी इच्छुकांचे शिष्टमंडळ राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहे. पाटणा येथील राजभवनात ही भेट होत आहे.
Mumbai Live : धक्कादायक ! पाच वर्षांमध्ये बेस्ट बसचे 834 अपघात !बेस्टने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती दिली आहे कि, गेल्या पाच वर्षात बेस्ट बसचे 834 अपघात झाले असून या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.बेस्टने जखमी आणि मृताच्या नातेवाइकांना दिली 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली असून 12 चालकांना आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलं आहे तर 24 जण निलंबित आहेत.
Tirupati Temple Fire : तिरुमाला मंदिराच्या लाडूवाटप काउंटरला लागली आगतिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच आंध्रप्रदेशातील तिरुमाला मंदिरातील लाडूवाटपाच्या काउंटरला आग लागली.
Mahakumbh Update : 13 हजार फुटांवर तरुणीने फडकवला महाकुंभचा ध्वज ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलबँकॉकमध्ये स्कायडायविंग करताना एका तरुणीने महाकुंभचा ध्वज आकाशात 13 हजार फुटांवर फडकवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Pathardi Live: शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता पारंपारिक उत्साहात अन् वेदमंत्रांच्या जयघोषातपाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान इथं शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता पारंपारिक उत्साहात आणि वेदमंत्रांच्या जयघोषात झाली.
Kolhapur Live: सदावर्ते कुटुंबावर संतोष शिंदे यांचे गंभीर आरोपएसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत ॲडव्होकाट गुणरत्न सदावर्ते आणि त्याच्या पत्नीने कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप शिव परिवहन वाहतूक कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी पत्रकार बैठक घेत केलाय. इतकेच नाही तर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेला एसटी बँक निरीक्षक राहुल रमेश पुजारी हा सदावर्ते यांचा वसुली एजंट असल्याचा आरोप करत त्यांनी मिरज शाखेतील कर्मचारी अनिल कोळी आणि अपहार केलेला आरोपी यांचे फोन संभाषण ऐकविले.
Nashik Live: मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तीन दिवसीय पतंग उत्सवाला सुरुवातनाशिकच्या येवल्यात तीन दिवसीय मकरसंक्रांत पतंग उत्सवाला सुरवात झाली आहे.
Beed Live : 'मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या'मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. तसंच खंडणीमुळे संतोष देखमुखांची हत्या झाली असून कराडवर 302 लावा अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.
Beed Live : 'उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा'उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसंच मागणी मान्य न झाल्यास संपुर्ण गाव आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.
Beed Live : 'भावाला न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही''भावाला न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही' अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. 'आमची चुक काय ते सांगा?' असा सवालही देशमुखांनी उपस्थित केला आहे.
Beed Live : जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुखनी फोडला टाहोधनंजय देशमुख यांनी अखेर 2 तासानंतर आंदोलन मागे घेतले आहे. जरांगेची गळाभेट करत धनंजय देशमुखांनी टाहो फोडला आहे. जरांगे आणि पोलिस अधिक्षकांच्या मनधरणीला यश आलय..
Beed Live सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुबांशी चर्चा करणारसीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुबांशी चर्चा करणार आहेत. तसंच सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी मस्साजोगमध्ये येत असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.
Beed Live: मला अस्वस्थ वाटतय- धनंजय देखमुखमला अस्वस्थ वाटत असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसंच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे.
Beed Live: धनंजय देशमुख टाकीवरून उतरत आहेत, समजूत काढण्यात जरांगे पाटील यशस्वीधनंजय देशमुख टाकीवरून उतरत आहेत. यावेळी त्यांची समजूत काढण्यात मनोज जरांगे पाटील यांना यश आले आहे
Beed News Live : मस्साजोगच्या महिलांनी पोलिसांना दाखवल्या बांगड्या, एसपी कावत यांच्या समोर घडला हा प्रकारमस्साजोगच्या महिलांनी पोलिसांना दाखवल्या बांगड्याची घटना घडला आहे. यावेळी एसपी कावत यांच्या समोर हा प्रकार घडला
Beed News Live : सरकार काय झोपलयं का? मस्साजोगचे ग्रामस्त आक्रमक Beed News: धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा जरांगेंचा प्रयत्नमनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद..
Beed Live: वाल्याला फाशी झालीच पाहिजे, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमकबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे
Beed News: धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जणांचे आंदोलन, गावकरी आक्रमकधनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जणांचे आंदोलन सुरु आहे.
Beed Live : धनंजय देशमुखांना शोले स्टाईल आंदोलना दरम्यान चक्करधनंजय देशमुख हे आंदोलन गावकऱ्यांसोबत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. दरम्यान त्यांना चक्कर आली आहे.
Beed Live : मनोज जरांगे पाटील मस्साजोगमध्ये पोहचले, आंदोलकांना टाकीवरुन खाली उतरण्याचे केले आवाहनधनंजय देशमुख हे आंदोलन गावकऱ्यांसोबत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील मस्साजोगमध्ये पोहचले असून आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती करत आहेत.
Beed Live : मस्साजोगमध्ये आंदोलनापूर्वी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तसंतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आज मस्साजोगमध्ये मोबाईल टाॅवरवर चढून आंदोलन करणार आहेत, दरम्यान पोलिसांनी मोबाईल टॉवरजवळ बंदोबस्त वाढविला आहे.
Mumbai Live : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरुराज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Beed Live : मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांची आनंदराज आंबेडकर यांनी घेतली भेटधनंजय देशमुख हे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. त्याआधी आनंदराज आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतली व समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
Ratnagiri Live : मंडणगडमध्ये एसटी बस दरीत कोसळलीरत्नागिरीमधील मंडणगडजवळ ृएका एसटी बसचा अपघात झाला आहे. एसटी बस दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. दरीत कोसळल्यानंतर बस एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
Mumbai Live : ईस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडीमुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस वे वरती वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Pune Weather Update : पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण, तापमानात मोठी घटशहरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेत गारवा आहे. गेल्या ४८ तासांत बदलत्या हवामानामुळे किमान व कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवेली तालुक्यात एक ते दोन अंशांनी वाढ झालीय. किमान तापमान १३.६ तर शिवाजीनगर परिसरातील किमान तापमानत १५.५ अंशांवर पोहचले.
Kolhapur : विशाळगडावर पोलीस बंदोबस्तात वाढविशाळगडावर उरुसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. उरुसाच्या पहिल्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यात भेट देत दर्शन घेतलं.
PM Modi LIVE : 'भारतीय संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा अतिशय खास दिवस'; महाकुंभ मेळाव्याला PM मोदींनी दिल्या शुभेच्छामहाकुंभ मेळाव्याला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू होत आहे, जो असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे."
प्रयागराज : महाकुंभमध्ये दाखल झालेले रशियन भक्त म्हणताहेत, "...'मेरा भारत महान'... भारत हा एक महान देश आहे. आपण पहिल्यांदाच कुंभमेळ्यात आलो आहोत. इथं आपण खरा भारत पाहत आहोत, खरी शक्ती भारतातील लोकांमध्ये आहे. आम्हाला भारत आवडतो.."
दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत थंडीची लाट आणि धुक्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या उशिराने धावत आहेत आणि काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.
खानापूर, कारवार : धार्मिक विधी आटोपून परतताना मोटार उलटून दांपत्य ठार झाले, तर गाडीतील अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज रविवारी (ता. १२) रोजी जमखेड येथे झाला आहे. मृत दांपत्य अंधेरी-मुंबई येथील असून, नागेंद्र सदाशिव भटकळ (वय ७२) आणि त्यांची पत्नी पूजा नागेंद्र भटकळ (वय ६५) अशी त्यांची नावे आहेत. नमिता नायक, दीप्ती प्रभू व नित्यानंद वामन नायक (रा. मंगळूर) अशी जखमींची नावे आहेत.
C. T. Ravi LIVE : भाजपचे विधान परिषद सदस्य रवी यांना धमकीचे पत्रबंगळूर : बेळगाव सुवर्णसौध येथे अधिवेशन काळात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आणि सीआयडी तपासाला सामोरे गेलेले भाजपचे विधान परिषद सदस्य सी. टी. रवी आणि त्यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तींकडून धमकीची पत्रे मिळाली आहेत. पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. १५ दिवसांत चिक्कमंगळूरहून बेळगावला यावे आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांचे हातपाय पकडून माफी मागावी, असे या निनावी पत्रात म्हटले आहे.
Donald Trump LIVE : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र मंत्री जाणारनवी दिल्ली : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व करतील. अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून ट्रम्प हे २० जानेवारीला शपथ घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज ही माहिती देण्यात आली. ट्रम्प-व्हान्स उद्घाटन समितीच्या आमंत्रणानुसार मंत्री जयशंकर या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यात जयशंकर हे नव्या प्रशासनातील प्रतिनिधींना आणि त्या प्रसंगी काही अन्य प्रमुख व्यक्तींशी देखील बातचीत करतील.
Latest Marathi Live Updates 13 January 2025 : जगातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सोमवार पासून सुरुवात होत आहे. प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे. तसेच अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व करतील. मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. ‘छत्रपती शिवरायांची मातीवर साकारलेली पहिलीच रांगोळी आहे. मिर्झापूरनंतर वारणेत छत्रपतींची सर्वांत मोठी रांगोळी साकारली आहे. त्याचबरोबर राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..