- नायलॅान मांजामुळे अपघात टाळण्यासाठी नागपूरातील १४ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद
- सदर, बर्डी, रामविलास, सक्करदरा, दिघोरी, गोळीबार पाचपावली, कळंबे चौक ते सदर, दहीबाजार, मेहंदीबाग यासह १४ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद असणार आहे....
- मकरसंक्रांतीत पतंग उडवताना नायलॅान मांजामुळे अपघात होतात.....गळ्यात अडकून अपघात होतात, त्यामुळे उड्डाणपूल बंद
- बंद केलेल्या प्रत्येक उड्डानपुलाचा दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे...
- मकरसंक्रांतीला दरवर्षी नायलॅान मांजामुळे उड्डाणपूलावर होतात अपघात... यासह मांज मुळे पक्षीही जखमी कोणाच्याही अनेक घटना घडत असतात...
Navi Mumbai: नवी मुंबईत गेल्या 12 दिवसांत 13 जणांचा रस्ते अपघातात मृत्यूनवी मुंबईत मागील 12 दिवसांमध्ये 32 लहान मोठ्या अपघाताच्या घटना
या अपघातात 13 जणांचा बळी गेलाय तर 25 जण जखमी झालेत.
यामध्ये सायन -पनवेल मार्गावर उरण फाटा येथे दोन महाविद्यालयीन तरुणांचा व वाशीतील कोपरी गाव येथे दोन तरुणींचा अपघात
बहुतेक अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे घडल्याची माहिती समोर
Beed News: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला आज न्यायालयात हजर करणारखंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला आज केज न्यायालयात हजर करणार आहेत.
दरम्यान कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून त्याचे आवाजाचे नमुने देखील घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
दुपारी तीनच्या दरम्यान कराड याला न्यायालयात हजर केले जाणार आहे
त्याआधी बीड शहर पोलीस ठाण्यातून त्याला केज येथील रुग्णालयात मेडिकलसाठी नेण्यात येईल
Nagpur News: नागपूरात अमली पदार्थ विक्रेत्याला पोलिसांकडून अटक- नागपूरात अमली पदार्थ विक्रेत्याला पोलिसांकडून अटक
- आरोपी विक्रेत्यांच्या ताब्यातून पोलीसांनी 12.3 ग्रॅम एमडी सह एकूण 6 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय..
- अझहर अहमद अंसारी एमडी विक्रेता आरोपीचे नाव आहे..
- 12 जानेवारी रोजी दुपारी साफळा रचून कामठी पोलीसांनी ही कारवाई केली आहे..
Nashik News: नाशिक पोलिस सतर्क, नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर होणार कारवाईनाशिक - आज मकर संक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजावर पोलिसांची करडी नजर
- नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी पालिसांनी तयार केले विशेष पथक
- नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी पोलिसांच्या ३१ पथकांची नियुक्ती
- शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर, छोट्या छोट्या गल्ली आणि मैदानावर पोलीस पथक मारणार धडक
- नायलॉन मांजा वापरत असल्याचं आढळून आल्यास थेट सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न या कलमाखाली होणार गुन्हा दाखल
- आतापर्यंत नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात केलेत ५० गुन्हे दाखल
- नायलॉन मांजा वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या ७ वडिलांना देखील पोलिसांनी केलीय अटक
- नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा
Ratnagiri News: मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत घेतली अधिकाऱ्यांची बैठकरत्नागिरी - मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत घेतली अधिका-यांची बैठक
अवैद्य मासेमारी विरोधात तात्काळ कारवाईचे दिले आदेश
अधिका-यांना नितेश राणे यांनी धरलं धारेवर
अनधिकृत कामांविरोधात कारवाईच्या दिल्या सुचना
अधिका-यांनी पारदर्शक काम करुन दंडात्मक कारवाई करावी
मत्स उत्पादन वाढीसाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या
कारभारात बदल न दिसल्यास त्या अधिका-याची गय केली जाणार नाही - नितेश राणे
Navi Mumbai: ऐरोलीमध्ये एका रात्रीत चार घरात चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैदऐरोलीमध्ये एका रात्रीत चार घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे
ऐरोली सेक्टर 2 मधील सिडकोच्या बैठ्या घरांच्या कड्या तोडून ही घरफोडी करण्यात आली
घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला
चोरट्यांचा वावर सिसीटीव्हीमध्ये कैद झाला
Navi Mumbai: नवी मुंबईतील दिघामध्ये भीषण आग, रिक्षा-टेम्पोसह २ दुकानं जळून खाकनवी मुंबईतील दिघा यादवनगर येथे पहाटे लागली आग.
आगीमध्ये एक रिक्षा एक टेम्पो आणि 2 दुकान जळून खाक.
एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विजवली.
सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश, अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढले आदेशरत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश
२६ जानेवारीच्या रात्रीपर्यंत मनाई आदेश जारी
महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ ते कलम ३७ १ आणि ३ नुसार मनाई आदेश
मकर संक्रांत आणि प्रजासत्ताक दिन या अनुशंघाने मनाई आदेश
अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढले हे आदेश
Nashik News: नाशिक महापालिकेत बदल्यांचे सत्र सुरूच, १६ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या- नाशिक महापालिकेत बदल्यांचे सत्र सुरूच
- महापालिकेच्या नगररचना विभागातील १६ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या
- नगररचना विभागातील १६ वरिष्ठ आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या एकाच वेळी बदल्या केल्याने चर्चांना उधाण
- गेल्या काही दिवसांपासून नगररचना विभागाच्या कामकाजासंदर्भात आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या तक्रारी
- नगररचना विभागातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आयुक्तांकडून एकाच वेळी १६ बदल्या
- या आधी देखील भूसंपादन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या खात्यातील अधिकाऱ्यांची मनीषा खत्री यांनी केली होती बदली
- कामकाजासंदर्भात कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, याआधीच आयुक्तांनी दिला होता इशारा
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेत 50 हजारांपेक्षा अधिक नारळ फुटलेविदर्भातील प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेत 50 हजारांपेक्षा अधिक फुटले नारळ..
यात्रेच्या दुसऱ्या आठवड्यातही भाविकांची मोठया संख्येने गर्दी कायम..
विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बहीरामच्या यात्रेची ओळख..
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भरते बहिरमची यात्रा खवय्यांची होते मोठी गर्दी..
Buldhana News: बुलडाण्यातील केस गळती व टक्कल प्रकरण, १५ दिवस उलटूनही आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेचबुलढाण्यातील केस गळती व टक्कल प्रकरण.
अद्याप आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच.
आज ICMR चेन्नई व दिल्लीचं पथक भागाचा दौरा करणार.
12 ते 15 गावात केस गळती व टक्कल पडण्याचा प्रकार समोर
Pune News: पुण्यामध्ये फुकट्या प्रवाशांवर PMPML कडून कारवाईपुण्यामध्ये फुकट्या प्रवाशांवर PMPML कडून कारवाई
PMPL ने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून PMPL ने वर्षभरात केला १ कोटी रुपयांचा दंड वसूल
मागील वर्षभरात तब्बल १८ हजार प्रवाशांनी विनातिकीट केला बसने प्रवास
महामंडळाने १ जानेवारी ते २३ डिसेंबर २०२४ या दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या केली जाहीर
Pune News: आरटीई फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश होणार रद्दआरटीई फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश होणार रद्द
आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी आज पासून करता येणार अर्ज
निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासारखे कागदपत्र महत्त्वाचे
पालकांनी ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरावी, शिक्षण विभागाच्या सूचना
Pune News: अमोल कोल्हेंंचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांंना पत्र, पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोधखासदार अमोल कोल्हे यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री यांना पत्र
पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दर्शविला विरोध
भूमिपुत्र म्हणून लढा देण्यासाठी तयार असल्याचा अमोल कोल्हे यांनी दिला इशारा
हा प्रकल्पाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्पोक- जीएमआरटी’ येत असल्याने त्यांच्या शास्त्रज्ञांनी त्यावर तोडगा काढावा अशी मागणी
पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प "चाकण - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - आळेफाटा - सिन्नर" याच मार्गाने व्हावा अशी सुद्धा मागणी
केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर भूमिपुत्र म्हणून माझा लढा अखेरपर्यंत सुरूच राहणार असल्याची अमोल कोल्हे यांची भूमिका