Mumbai News : हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता बीड प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे. तर निवृत्त न्यायाधीश एम.एल ताहिलाीयांनी आणि परभणी प्रकरणात व्ही.एल अचलिया यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून बीड आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची बुधवारी(ता.15) घोषणा करण्यात आली आहे. ही समिती या दोन्ही प्रकरणांत कोणालाही चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या एन्ट्रीनं बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाच्या धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. त्यातच या प्रकरणात दररोज मोठं-मोठे खुलासे होत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.