फक्त 20 मिनिटे थांबले असते तर मृत्यूच समोर होता…बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा दावा
GH News January 18, 2025 06:09 PM

Sheikh Hasina new claim: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. भारतात आल्यानंतर शेख हसीना यांनी अनेक दावे केले आहेत. आता शेख हसीना यांनी बांगलादेशच्या अवामी लीग फेसबुक पेजवर एक ऑडियो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण त्या ठिकाणी 20 ते 25 मिनिटे अधिक थांबलो असतो तर आपली हत्याच झाली असती, असा म्हटले आहे. आपणास मारण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच माझी लहान बहीण शेख रेहाना यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.

शेख हसीना यांनी काय म्हटले?

मागील वर्षी बांगलादेशमध्ये शेख हसीना पंतप्रधान असताना हिंसक जमाव जमला होता. हा जमाव पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसला होता. त्यापूर्वीच शेख हसीना त्या ठिकाणावरुन बाहेर पडल्या. अन्यथा त्या दिवशी त्यांची हत्या झाली असती. 21 ऑगस्ट 2024 रोजी हिंसक जमावापासून वाचणे आणि कोटलीपारा बॉम्ब हल्ल्यातून वाचणे हे केवळ अल्लाहच्या मर्जीमुळे झाले. माझ्या हातून अजून काही कामे करायची बाकी आहे. यामुळे आपणास अल्लाहने वाचवले, असे शेख हसीना यांनी म्हटले. परंतु मला आपला देश आणि आपल्या घरापासून लांब राहवे लागत आहे.

शेख हसीनाविरोधात वॉरंट

शेख हसीना यांनी सांगितले की, आपल्या हत्येचा कट यापूर्वी रचण्यात आला होता. 21 ऑगस्ट 2004 रोजी आपल्या सभेच्या वेळी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. त्यात 24 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. मलाही थोड्या जखमा झाल्या होत्या. परंतु त्या हल्ल्यातून मी वाचले.

दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शेख हसीना विरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्यांच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात अचानक लोक गायब झाल्यामुळे हा वॉरंट काढला आहे. त्यात त्यांच्या प्रशासनाने 500 पेक्षा जास्त व्यक्तींचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटले की, शेख हसीना यांना आता न्यायालयासमोर आले पाहिजे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.