जेवल्यानंतर का होते गोड खाण्याची इच्छा? जाणून घ्या काय आहे कारण
GH News January 18, 2025 06:09 PM

काही जणांना जेवण केल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते पण हे आरोग्यासाठी चांगले नाही. आता प्रश्न असा आहे की जेवण केल्यानंतर गोड खाण्याची इच्छा का होते? याचे उत्तर डायट कोच तुलसी नितीन यांनी दिले आहे. तुलसी नितीन ने त्यांच्या इंस्टाग्राम वर याचे कारण सांगितले आहे. खरे तर तुलसी नितीनने वजन कमी करण्याच्या प्रवासात 30 किलो वजन कमी केले आणि गोड खाण्याची इच्छाही नियंत्रित केली आहे. तुलसी नितीन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंट वर वजन कमी करण्याच्या आहाराशी संबंधित काही टिप्स शेअर केल्या आहे. अलीकडेच त्यांनी एका पोस्टमध्ये गोड खाण्याचा इच्छेबद्दल देखील सांगितले आहे.

पोस्ट शेअर करताना तुलसी यांनी लिहिले आहे की, मला आठवते की वजन कमी करण्याच्या प्रवासात मला जेवल्यानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा होत होती आणि मी अनेकदा गोड खात होते यानंतर मला खूप अपराधी वाटायचे. या मागचे कारण समजल्यावर मी माझ्या आहारात बदल केला त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसले आणि माझे वजन 30 किलो कमी झाले. गोड खाण्याची इच्छा होण्याची सहा कारणे त्यांनी सांगितली आहे.

जेवल्यानंतर का होते गोड खाण्याची इच्छा

रक्तातील साखरेची अस्थिरता जर तुमचे जेवण शुद्ध कर्बोदकांनी समृद्ध असेल तर तुमची रक्तातील साखर वेगाने वाढू शकते आणि जेवल्या नंतर लगेच कमी होऊ शकते. यामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळण्यासाठी शरीराला साखरेची गरज असते म्हणून तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते.

भावनिक कारण बरेच लोक आराम मिळवण्यासाठी किंवा स्वतःला खुश करण्यासाठी गोड खातात. या भावनिक संबंधांमुळे गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. जरी तुम्हाला त्याची भूक लागली नसती तरीसुद्धा.

सवय लागणे जर तुम्हाला प्रत्येक जेवणानंतर गोड खाण्याची सवय लागली असेल तर तुमच्या मेंदूलाही त्याची सवय होते. म्हणूनच जेवल्यानंतर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते.

पौष्टिक आहाराचा अभाव जर तुमच्या जेवणामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुमचे शरीर गोड खाऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते.

डिहायड्रेशन अनेक वेळा आपल्याला भूक लागल्याने तहान लागते. ज्यामुळे आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते तर प्रत्यक्षात आपल्याला पाण्याची गरज असते. डीहायड्रेशन मुळे गोड खाण्याची इच्छा देखील उद्भवते.

कमी ऊर्जा पातळी तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा ऊर्जेची कमतरता वाटत असेल तर साखरेपासून झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही गोड खाण्याकडे आकर्षित होऊ शकतात. या कारणास्तव देखील काही लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.