उचगाव येथून मोपेड चोरीस
गांधीनगरः ः चोरट्याने उचगाव महामार्गाजवळून मोपेड चोरीस नेल्याची तक्रार विजय वसंतराव भोसले (वय ४७, रा. विक्रमनगर, नवदुर्गा गल्ली, कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलिसांत दिली. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, विजय यांच्या आई ही मोपेड वापरतात. काळ्या रंगाची आणि निळा पट्टा असलेली ही मोपेड (क्रमांक एमएच ०९ ए पी ११४४) उचगाव महामार्गाजवळील दत्त मंदिराजवळ असलेल्या पानपट्टीशेजारी पार्क केलेली होती. सात जानेवारी ते अकरा जानेवारीदरम्यान या जागेवरून ही मोपेड चोरीला गेली असल्याची फिर्याद भोसले यांनी गांधीनगर पोलिसांत दिली आहे.