अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठजवळ अपघात
अपघातानतंर थेट एका नागरिकांच्या घरात कार शिरली
सुदैवाने यात जीवितहानी नाही
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको
अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासाभरापासुन ठप्प
अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्यासाठी मागणी
आपल्या घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखला
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात, एक जण जागीच ठारसमृद्धी महामार्ग चानैज क्रमांक 336.8 मुंबई कॉरिडोर वर एक भीषण अपघात झाला.
अपघात एवढा जोराचा होता की यामध्ये कारचा अक्षरचा चुराडा झाला व रस्त्यावर कारचे अलग अलग पार्ट विखुरली गेले.
सकाळी कार क्रमांक MP-28-CB-9530 चा चालक श्रव मेलानी वय वीस वर्ष राहणार नागपूर, हे आपल्या मित्रासोबत नागपूर वरून संभाजीनगरकडे जात असताना कारचालकला झोपेची डुलकी लागल्याने कार अनियंत्रित होऊन समोर जात असलेला ट्रक वर जाऊन धडकली.
धुळे मॅरेथॉनच्या अनुषंगाने प्रोमो रन व हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हल उत्साहात संपन्नधुळे मॅरेथॉन 2025 सीजन - 3 च्या अनुषंगाने आयोजित प्रोमो रन आणि हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हलचा भव्य उपक्रम कालिका माता मंदिर परिसरात उत्साहात पार पडला आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रोमो रनच्या निमित्ताने नागरिकांनी आरोग्य आणि फिटनेससाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हल ने सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र आणून मनोरंजन, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे.
या उपक्रमामुळे धुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर बसला अचानक आग, बस चालकाच्या प्रसंगावधानाने 12 प्रवाशांची जीव वाचलेपुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली.
तातडीने आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली.
या शिवशाही बस मधून 12 प्रवासी प्रवास करत होते. मात्र बस चालकाच्या बसला आग लागल्याचे लक्षात येताच त्याने बस बाजूला घेतली व 12 प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.
त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बस चालकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र बसने अचानक पेट घेतल्याने एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ठप्प झाली. मात्र आग विझताच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Saif Ali Khan: सैफ अली खान हल्ला प्रकरण, आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर केले जाणारसैफ अली खान हल्ला प्रकरण
आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात
आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले आहे
थोड्याच वेळात वांद्रे येथील भाभा रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार
त्यानंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजनमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
या मोर्चात जवळपास एक लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता
पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त या मोर्चाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात असणार आहे
वाहने आणि मोर्चा मार्गावरील गर्दी पाहता वाहतुकीत देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत
शहरातील चार प्रमुख मार्गांवरील रस्ते मोर्चा सकाळी १० वाजल्यापासून तर संपेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune News: पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर शिवशाही बसला अचानक आगपुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर बसला अचानक आग
बस चालकाच्या प्रसंगावधानाने 12 प्रवाशांचा जीव वाचला
आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Pune News: मुंबई - पुणे महामार्गावर वाहनाला भीषण आगमुंबई - पुणे महामार्गावर वाहनाला भीषण आग
तळेगाव टोल नाक्याच्या पुढे लागली आग
आगीमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
Amravati News: चंद्रशेखर बावनकुळे २५ जानेवारीलाा अमरावतीच्या दौऱ्यावरराज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर
पालकमंत्री पदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार पश्चिम विदर्भाचा महसूल विभागाचा आढावा आढावा
पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त सोबत पालकमंत्री बावनकुळे यांची बैठक
Dharashiv News: धाराशिवमधील त्या वाघाचा शोध सुरूच, वन विभागाच्या पथकाने २३०० हेक्टर वनक्षेत्र घातले पालथेधाराशिवमधील त्या वाघाचा शोध सुरूच
वन विभागाच्या पथकाने २३०० हेक्टर वनक्षेत्र घातले पालथे
गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे शोध मोहीम
वाघ सापडेपर्यंत शोध मोहीम सुरूच राहणार
Dhananjay Munde: धनंजय मुंडे शिर्डीत दाखल, नवसंकल्प शिबिराला लावणार हजेरीधनंजय मुंडे पहाटे चार वाजता शिर्डीत दाखल
धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
धनंजय मुंडे आणि अजित पवार शिर्डीतील हॉटेल सन अँड सॅण्ड येथे मुक्कामी.
मुंडे यांची काल नवसंकल्प शिबिराला दांडी तर आज लावणार हजेरी
पालकमंत्रीपदी डावलल्यानंतर मुंडे पहाटे शिर्डीत दाखल
संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता