नुकताच 17 जानेवारीला गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar ) यांचा वाढदिवस झाला. जावेद अख्तर आता 80 वर्षांचे झाले आहेत. जावेद अख्तर हे लेखक, गीतकार आणि मोठे कवी आहेत. हाथी मेरे साथी, शोले, दीवार आणि अंदाज अशा अनेक चित्रपटांच्या त्यांनी पटकथा लिहिल्या आहेत. जावेद अख्तर पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त २७ पैसे होते.
बॉलिवूड अभिनेता खान, चित्रपट निर्माता फरहान अख्तर आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी जावेद अख्तर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 'चाहता है' (Dil Chahta Hai) चित्रपटाचे शीर्षकगीत गायले. 'दिल चाहता है' हा चित्रपट 2001मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या तिघांच्या एकत्र गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.
व्हिडीओमध्ये महादेवन निळ्या रंगाचा कुर्ता आणि मॅचिंग ट्राउझर्समध्ये दिसत आहेत. तर आमिरने निळा कुर्ता आणि काळी पँट परिधान केली आहे. दुसरीकडे फरहान प्रिंटेड बेज रंगाचा कुर्ता आणि पँटमध्ये दिसला. या तिघांच्या गाण्यावर सर्वजण नाचताना आणि गाण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. चाहते कमेंट्समध्ये 'नॉस्टॅल्जिया' असे म्हणत आहेत. तसेच त्यांच्या आवाजावर सुंदर कमेंट्स करत आहेत.
'दिल चाहता है' हा कॉमेडी-ड्रामा सिनेमा आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शंकर-एहसान-लॉय यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट खूप गाजला होता. जावेद अख्तर यांचे खरे नाव जादू आहे. जादू हे नाव जावेद अख्तर यांच्या वडिलांनी लिहिलेल्या कवितेच्या एका ओळीतून आले होते. कवितेचे ओळ 'लम्हा-लम्हा किसी जादू का फसाना होगा' अशी होती.