देशात कार इंडस्ट्री सध्या तुफान तेजी आहे. एकीकडे नवनवीन कार बाजारात येत आहेत. तर दुसरीकडे इलेक्ट्रीक कारचे मार्केट तेजीत आहे. आता भारतीय बाजारात तर सोलर कारचा प्रवेश झाला आहे. ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो – २०२५’ च्या इव्हेंटमध्ये पुणे बेस्ड इलेक्ट्रीक व्हेईकल स्टार्टअप कंपनीने व्हेव मोबिलिटी ( Vayve Mobility ) देशाची पहिली सोलर पॉवर कार ‘Vayve Eva’ ला लाँच केली आहे. तीन मीटर पेक्षाही छोटी या इलेक्ट्रीक कारची किंमत देखील अंत्यत कमी आहे. कंपनीने दावा केला आहे की एका सिंगल चार्जिंवर ही कार २५० किलोमीटरपर्यंत धावू शकते.
Vayve EVA च्या सोलर कारच्या डिझाईनमध्ये सोलर पॅनलला सनरुफच्या जागी हे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. या कारचा एक किलोमीटर चालविण्याचा खर्च केवळ ८० पैसे असणार आहे. ही देशाची पहिली सोलर पॉवर्ड इलेक्ट्रीक कार आहे. याच्या फ्रंटमध्ये सिंगल सीट आणि रियर सीटमध्ये थोडी रुंद सीट दिली आहे. तेथे एक प्रोढ व्यक्ती सोबत एक लहान मुलगा बसू शकतो. याच्या ड्रायव्हींग सीटला सहा प्रकारे एडजस्ट करता येऊ शकते. या शिवाया या कारला पॅनारॉमिक सनरुफ दिलेले आहे. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील दिला आहे.
या कारमध्ये एसी असून अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम दिलेली आहे. त्याची लांबी ३०६० मिमी, रुंदी ११५० मिमी, उंची १५९० मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. या कारच्या पुढच्या बाजूला इंडिपेंडेंट कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूला ड्युअल शॉक सस्पेंशनची सोय करण्यात आली आहे. यात पुढच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिलेले आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंगची सुविधा असलेल्या या कारचा टर्निंग रेडियस ३.९ मीटर आहे. या रियर व्हील ड्राईव्ह कारचा टॉप स्पीड ७० किमी प्रती तास आहे.
या कारमध्ये १८ Kwh ची लिथियम – ऑर्यन बॅटरीचा पॅक देण्यात आला आहे. यात लिक्वीज कूल्ड इलेक्ट्रीक मोटरचा वापर केला आहे. १२ kw ची पॉवर आणि ४० Nm टॉर्क जेनरेट करतो. कार सिंगल चार्जिंगमध्ये २५० Km पर्यंतचा ड्रायव्हींगची रेंज देते. यात सोलर पॅनल देण्यात आले आहे त्यात कारच्या सनरुफच्या जागी वापर करु शकतो. यात १ km पर्यंत ड्रायव्हींगचा ८० पैसे खर्च येतो. पाच सेंकदात ही कार ० ते ४० किलोमीटरची प्रति तासाचा वेग पकडते. तर फूल चार्जिंगसाठी या कारला ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. तीन मीटर पेक्षाही छोटी या इलेक्ट्रीक कारची किंमत देखील अंत्यत कमी आहे. कंपनीने दावा केला आहे की एका सिंगल चार्जवर ही कार २५० किलोमीटरपर्यंत धावू शकते.