Latest Maharashtra News Updates : राज्यात अवकाळीचे संकट, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा
esakal January 19, 2025 07:45 PM
किल्ले राजगड आणि तोरणागडावर बिबट्याचा मुक्त संचार; पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

किल्ले तोरणागड आणि मेटपिलावरे (ता. राजगड) परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसून येत आहे, ज्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोरणागडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्याचा चित्रीकरण केला आहे. यामुळे वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

रायगडमध्ये पालमंत्रीपदावरून नाराजीनाट्य, गोगावलेंच्या समर्थकांनी रोखला महामार्ग

राज्यात कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची यादी जाहीर झालीय. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद पेटला आहे. आदिती तटकरे यांना जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलंय. तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं नाहीय. यामुळे गोगावले समर्थकांनी नाराजी व्यक्त करत महामार्ग रोखण्यात आला होता.

Weather Update : राज्यात अवकाळीचे संकट, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा

राज्यात अवकाळी पावसाचे संकट असून काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.