रायगडचे पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न दिल्यामुळे रायगडमध्ये जोरदार राडा झाला आहे. नाराज गोगावले समर्थकांनी शनिवारी रात्री काही काळासाठी महामार्गही रोखला होता
Dhananjay Munde : दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला अधिकची गतीमहायुती सरकारची पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यात बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे देण्यात आलं आहे. यानंतर बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना न मिळाल्याची चर्चा सुरू होती. अशातच त्यांनी ट्विट करत बीडचं पालकत्व अजितदादांनी घ्यावं अशी मीच त्यांना विनंती केली होती, असं सांगितलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, मीच अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली होती. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.