दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले…
Marathi January 19, 2025 02:24 PM

महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांच्या यादीत गुलाबराव पाटील : राज्य सरकारकडून शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडला अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र या दोघांना पालकमंत्रिपदापासून डावलण्यात आले. आता यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यावर अन्याय झालाय. दादा भुसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री आहेत. तर भरत गोगावले हे तीन वेळा आमदार झाले आहेत. कोकणातील चेहरा आहे, त्यांना पालकमंत्रिपद मिळायला हवे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

त्याबाबत मी बोलू इच्छित नाही

तर बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बीडचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. याबाबत विचारले असता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्याबाबत मी बोलू इच्छित नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्यांदा पालकमंत्रिपद मिळाले, ही दुर्मिळ गोष्ट

गुलाबराव पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद देण्यात आले. याबाबत विचारले असता तीन पक्षांच्या सरकारमध्ये आपल्याला जनतेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा पालकमंत्रिपद मिळाले, ही दुर्मिळ गोष्ट आहे. पालकमंत्रिपदाची अपेक्षा असली तरी आपण त्याची कुठेही मागणी केली नव्हती. जिल्ह्यात आता चार मंत्री असल्याने जिल्ह्याचा चांगला विकास होईल. विकासाला आपण प्राधान्य देणार आहोत. मागील पाच वर्षात आपण जनता आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास करण्याचा प्रयत्न केला होता. मागील काळात आपल्याकडून काही चूक झाल्या असतील. मात्र, विकासकामांना आपले प्राधान्यक्रम राहिले आहे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Dhananjay Munde : …तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.