Want to withdraw the application of ladaki bahin yojana, learn how to apply
Marathi January 19, 2025 02:24 PM


ज्या महिलांना याचा लाभ घ्यायचा नाही, त्या तालुका तसेच जिल्हा स्तरीय महिला आणि बालकल्याण अधिकारी, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात लेखी अर्ज करू शकतात.

मुंबई : निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष निवडणुकीनंतर बदलल्याची ओरड विरोधकांकडून सातत्याने होते आहे. आता याचे निकष बदलो अथवा न बदलो तरीही पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतःहूनच अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिली. (want to withdraw the application of ladaki bahin yojana, learn how to apply)

तुम्हालाही जर अर्ज मागे घ्यायचा असेल तर काय करायचे आहे, तुम्हाला माहीत आहे का. आम्ही त्याचीच माहिती देणार आहोत. या योजनेचे संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यात 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ज्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही पण यासाठी अर्ज केला आहे, त्याची देखील पडताळणी केली जाणार आहे.

ज्या महिलांना याचा लाभ घ्यायचा नाही, त्या तालुका तसेच जिल्हा स्तरीय महिला आणि बालकल्याण अधिकारी, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात लेखी अर्ज करू शकतात. ज्या बहिणींनी या योजनेच्या निकषांनुसार पात्र न झाल्याने अर्ज रद्द करण्यास सांगितला आहे, त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जात तक्रार निवारणाचा पर्याय निवडायचा आहे. यात त्या या योजनेसाठी पात्र नाहीत, असे सांगत ऑनलाइन तक्रार करायची आहे.

या योजनेसाठी ज्यांनी चुकीचा अर्ज भरला आहे, त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. पुढचा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे. मात्र, तोवर लाभार्थ्यांची संख्या आधीपेक्षा कमी असेल.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी सरकारला केले पैसे परत; चार हजार महिलांनी परत घेतले अर्ज

राज्यभरातून अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्याला पैसे नको असल्याचे सांगितले आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याच्या भीतीने लाडक्या बहिणींनी अर्ज माघार घ्यायला सुरुवात केली आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी त्यांनी मिळवलेली रक्कम थेट हस्तांतर योजनेशी सलंग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील अनेक महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

या योजनेसाठी राज्यातील 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केला होता. त्यातील 2 कोटी 47 लाख महिला या यासाठी पात्र आहेत. यातील 2 कोटी 34 लाख महिलांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे 1500 रुपये दर महिना देण्यात आले. पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील, असा अंदाज आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad On Karad : वाल्मीक कराड माझ्या जातीतला पण; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.