Maharashtra Live Update : मुंबईत आंदोलकांचा पोलिसांवर दगडफेक, जोगेश्वरीतील घटना
Saam TV January 22, 2025 11:45 PM
राजन साळवीचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची एसीबी चौकशी

साळवी कुटुंबाचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची एसीबी चौकशी पूर्ण

रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जवळपास दीड तास झाली दिनकर सावंत यांची चौकशी

भागीदार असताना जी काम केली त्या निविदांचे कागदपत्र एसीबी कार्यालयात जमा केले

राजन साळवी यांच्या विषयी मला काही विचारलं नाही

वर्क ऑर्डर संदर्भातील कागदपत्र एसीबी कार्यालयात दिली आहेत

जे मागितलं ते सर्व acb कार्यालयात दिलं आहे - दिनकर सावंत

Maharashtra Live Update : मुंबईत आंदोलकांचा पोलिसांवर दगडफेक, जोगेश्वरीतील घटना Maharashtra Live Update : बोगस पिक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द

- बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर शासनाकडून कारवाईला सुरुवात

- बोगस पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

- बोगस पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे सरकारनं भरलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार

- नाशिक जिल्ह्यात तब्बल साडे चार हजार शेतकऱ्यांनी भरला होता बोगस पीक विमा

KALYAN : कल्याणात भटक्या कुत्र्यांमुळे नागरीक भयभीत

कल्याणमध्ये टावरी पाडा परिसरात शंकेश्वर प्रेसिडेन्सी ही इमारत आहे. या परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरीक दहशतीच्या छायेत वावरत आहेत. काही दिवसापूर्वी काही लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. स्थानिक रहिवासीयांनी घटनेचा सीसीटीव्ही केडीएमसीला देऊन भटक्या कुत्र्यांसंदर्भात लवकर उपाययोजना केली जावी अशी मागणी केली होती.मात्र केडीएमसीने या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकानी केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे ये जा करणे देखील मुश्किल झाले असून नागरिक भीतिच्या वातावरणात आहे.

Maharashtra Live Update : संदीप क्षिरसागर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट..

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांचे केले अभिनंदन. .

MIDC चा विकास व्हावा जेणेकरून बीड शहरात अधिकाधिक उद्योग यावेत व त्यातून रोजगार निर्मिती होऊन जिल्हा विकासाचा वाटेवर यावा, याबाबत पवारांकडे केल्या मागण्या.

संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

मीरा भाईंदर -तीन बांगलादेशी नागरिक अटकेत

मिरा भाईंदर अनैतिक मानवी शाखेनी तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.यांनी भारतात घुसखोरी केली होती.मागील अनेक वर्षापासून त्यांचं इथे वास्तव्य आहे.मिरा भाईंदर पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आहे.त्यांच्याकडून काहीक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.मिरा भाईंदर शहरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत आहेत.त्यांची कोणत्याही प्रकारची नोंद प्रशासनाकडे नाही.त्यामुळे पोलिसांकडून अधिक कारवाई होणे गरजेचे आहे.

Maharashtra Live Update : शक्तिपीठ महामार्गाला लातूर मधून देखील विरोध

शक्तिपीठ महामार्ग निर्मितीमुळे लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जात आहेत.., दरम्यान शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे.. विदर्भातल्या वर्धा येथू गोवा पर्यंत जाणारा हा 800 किलोमीटरचा महामार्ग आहे.तर राज्यातल्या 12 जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र यांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा महामार्गात लातूर जिल्ह्यातील 35 ते 40 गावामधून हा जाणार आहे... तर महामार्गात लातूर जिल्ह्यातील 481 हेक्टर जमीन बाधित होणार आहे... त्यामुळे मराठवाडा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने येत्या 24 जानेवारी रोजी राज्यातील 12 जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे.

रसायन मिश्रित पाणी ओढ्यात सोडल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळाली तर ओढया नाल्यांमध्ये मासे,साप मृत अवस्थेत

पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी परिसरात असलेल्या जांभूळ ओढ्यात मोठ्या प्रमाणावर रासायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे या परिसरातील विहिरीचे तसेच कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. या रसायनमिश्रित पाण्यामुळे ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक जळाले असून या रासायनिक पाण्यामुळे आसपासच्या वस्तीवर राहाणाऱ्या नागरिकांचे आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुपा एमआयडीसी जवळ असणाऱ्या जांभूळ ओढ्यात अज्ञात व्यक्तीने रसायनिमित्रित पाणी सोडल्याने विहिरी आणि कूपनलीकांचे पाणी खराब झाले आहे. विहिरीतील मासे ओढ्या मधील साप मरून पडले आहेत.विहिरीच्या पाण्यावर लालसर तवंग आला आहे त्यामुळे पाणी पिण्यास योग्य राहिले नाही. त्यामुळे जनावरांसह येथील नागरिकांचाही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ओढ्याकाठचे गवतही जळू लागले आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींचे आणि कूपनलिकांचे पाणी शेतातील पिकांना द्यावे की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांसमोर असून हा प्रकार संबंधित ग्रामपंचायत तहसीलदारांना सांगूनही या प्रकार कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Maharashtra News : परशुराम घाटाला ग्लॅबिंग वॉल लोखंडी जाळ्याचे संरक्षण

परशुराम घाटाला ग्लॅबिंग वॉल लोखंडी जाळ्याचे संरक्षण

दरडीच्या टप्प्यात उपाययोजना सुरू

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न

गेली अनेक वर्ष वाहतुकीला त्रास दायक ठरलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट

या घाटातील धोकादायक ठरलेल्या दर्डीच्या ठिकाणी कोकण रेल्वे प्रमाणे लोखंडी जाळीद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत

त्याशिवाय कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबिलिंग वॉल उभारण्याचे काम देखील सुरू केले आहे

पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे

उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे

Maharashtra Live Update : वाल्मीक कराडला CPAP मशीन वापरण्यास कोर्टाची मंजुरी

वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहात ठेवणार..

आजची रात्र ही बीड जिल्हा कारागृहात असणार

मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या बीड की हर्सूल कारागृहात ठेवायचं ? यावर अधिकाऱ्यांमध्ये विचार विनिमय सुरू

सूत्रांकडून मिळाली माहिती

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे राज्य सरचिटणीस संजय गाडेकर यांचा राजीनामा

बुलढाणा जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे राज्य सरचिटणीस संजय गाडेकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. संजय गाडेकर हे राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते शरद पवार यांच्या सोबत आहेत मात्र अचानक त्यांनी दिलेला राजीनामामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. त्यांनी राजीनामाचे पत्र शरदचंद्र पवारांकडे पाठवले असून अद्याप पवारांनी तो स्वीकारला नसल्याची ही माहिती आहे.....

विजय वडेट्टीवार वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी दिली, मात्र पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितली असती, तर नवीन प्रकरण उजेडात आले असते... मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखा करतो तू रडल्यासारखा कर अशीच दिसून येत आहे... सुरेश धस वेगळं म्हणतात, अजित दादा वेगळे म्हणतात.. धनंजय मुंडे यांचे हात एवढे गुंतलेले असताना कारवाई करण्यासाठी का दिरंगाई केली जात आहे... बीड म्हणजे भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न आहे. Pune : मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची चोरी.

व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना विमाननगर भागात घडली.

याप्रकरणी नीतेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारींची काच फोडून रोकड, लॅपटॉप चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर भागात दोन मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती.

Maharashtra Live Update : क्रिकेटपटू कृणाल पंड्या साईचरणी नतमस्तक

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू कृणाल पंड्या याने शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.. दर्शनानंतर कृणालचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.. नवीन सुरू झाल्यानंतर शिर्डीत नेते, अभिनेते आणि खेळाडू हे साई दर्शनासाठी हजेरी लावत असल्याचे चित्र आहे..

शनिवार वाड्याचे संवर्धन होत नसल्याची खंत आणि नाराजी आयोजकांनी व्यक्त केली

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला आज 293 वर्ष होत आहे ..मात्र आज ही ऐतिहासिक शनिवार वाडा हा दुर्लक्षित आहे. वर्षातून एकदा शनिवार वाडा उघडला जातो. शनिवारवाड्यात बाबत जेवढं अपेक्षित आहे. तेवढे संवर्धन वाड्याचे झालेले नाही . राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लक्ष घालून शनिवार वाड्याचे संवर्धक केले पाहिजेत अशी खंत यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Live Update : वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, खंडणी प्रकरणात कोर्टाचा निर्णय Walmik Karad : पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक; मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा समाज आंदोलकांनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपुरात जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा समाज मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. मोर्चे कर्यांच्या भावना तीव्र आहेत. सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप ही आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी....

Walmik Karad : बीडच्या मांजरसुंबा येथे वाल्मीक कराडच्या पत्निच्या नावे 9 एक्कर जमीन..

खंडणी हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात ९ एकर जमीन असून, परिसरात एकूण ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आलियाबाद ग्रामपंचायतला दिल्लीतील प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण

:धाराशिव जिल्ह्यातील आलियाबाद ग्रामपंचायतला दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व गोरगरिबांच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतने केलेल्या कामाची दखल घेत केंद्र सरकारकडून हे निमंत्रण देण्यात आल आहे.

Walmik Karad : वाल्मीक कराडची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार सुनावणी

वाल्मीक कराडची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे होणार सुनावणी

कोर्टाने दिली परवानगी

आज दुपारी होणार बीड जिल्हा न्यायालय मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी

कराडला न्यायलयात हजर केले तेव्हा झाला होता गोंधळ

यामुळे पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे अर्ज करून केली होती मागणी

कोर्टाने दिली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेण्यास परवानगी

Maharashtra Live Update : वाल्मीक कराडला खोकला अन् ताप. वैद्यकीय तपासणीत माहिती समोर आली. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक कराडची वैद्यकीय तपासणी पूर्ण Dhule : धुळे महसूल कर्मचाऱ्यांचा काम बंदचा पावित्रा कायम

महसूल अधिकारी मारहाण प्रकरणात महसूल कर्मचारी आक्रमक

महसूल अधिकारी मारहाण करणाऱ्यास अटक करण्याची मागणी

Beed News : बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलेल्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता. यामुळं पुन्हा असा प्रकार घडू नये आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाढवला पोलीस बंदोबस्त Agro : कांद्याचे कोसळणारे बाजार भाव स्थिरवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या आठवड्यात कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या आत सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते मात्र आता कोसळणाऱ्या कांदा बाजार भावाला ब्रेक लागला असून कोसळणारे कांद्याचे सरासरी बाजार भाव 2400 रुपयांपर्यंत स्थिरवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 1555 वाहनातून 28 हजार 512 क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती त्याला जास्तीतजास्त 2951 रुपये, कमीतकमी 1000 हजार रुपये तर सरासरी 2400 रुपये इतका बाजार भाव प्रतिक्विंटल कांद्याला मिळत आहे.

crime News : सिंदखेड राजा येथील स्नेहल ज्वेलर्स वरील दरोड्यातील चौघांना बेड्या

जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 ऑगस्ट 2024 रोजी स्नेहल ज्वेलर्स वर रात्रीच्या सुमारास भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्यात आला होता यात मोठ्या प्रमाणात सोने व चांदीची लूट दरोडेखोरांनी केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दरोडेखोरांकडून अजूनही काही ठिकाणी दरोडे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

nashik News : मालेगाव महापालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर

मालेगाव शहरात चौकात चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून या बाबतीत शहरातून अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांनी चांगलंच मनावर घेतले असून, आलेल्या तक्रारींचा विचार करता महानगरपालिका अतिक्रमण विभाग चांगलेच अलर्ट मोडवर आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे लगत असलेल्या अतिक्रमणाला काढण्यास सुरुवात केली असून उर्वरित अधिक्रमण धारकांना महापालिकेने त्वरित अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अतिक्रमण स्वतःहून न काढल्यास महापालिका अतिक्रमण काढेल अशा सूचना मनपा कडून अतिक्रमण धारकांना देण्यात आल्यात. महापालिकेकडून अतिक्रमण निर्मूलनची मोठी मोहीम देखील राबवण्यात आल्याचे मालेगावकरांनी स्वागत केलं आहे. मात्र, येणाऱ्या काळात देखील अशीच मोहीम सुरू राहावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

पुण्यात टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण

पुणे-मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समितींच्या आवारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दरात घसरण

घाऊक बाजारात टोमॅटोला प्रतवारीनुसार प्रतिकिलोला ४ ते ५ रुपये, तर किरकोळ बाजार १ किलोला १५ ते २० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलोला शंभर रुपयांपर्यंत गेले होते

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील सर्वच बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढल्याने परिणामी दरात घसरण झाली आहे

Walmik karad News : वाल्मीक कराडची मकोका गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली; आज होणार सुनावणी

वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे..मात्र त्यानंतर वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाने मकोका गुन्ह्यात वाल्मीक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र ही पोलीस कोठडी आज संपली असून कराडच्या मकोका गुन्ह्यात आज बीड जिल्हा न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान वाल्मीक कराडला बीड जिल्हा न्यायालयात ज्यावेळेस हजर केलं होतं. त्यावेळेस मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे त्यानंतर सुदर्शन घुलेसह सहा जणांची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आली होती. त्यामुळे आजची कराडची सुनावणी देखील व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सुनावणी कडे आता संबंध राज्याचे लक्ष लागलंय...

Agro : वातावरणातील बदलामुळे हिरव्या मिरची वर रोगाचा प्रादुर्भाव

वातावरणात सातत्याने बदल होत आहे.वातावरणातील या बदलामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.त्याच बरोबर भाजी-पाला पिकांना देखील याचा फटका बसताना दिसत आहे.नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील विनायक मुदखेडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात हिरव्या मिरचीची लागवड केलीय.या मिरची लागवडीसाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला.एक लाख वगळता त्यांना या मिरचीच्या उत्पादनातून जवळपास तीन लाख उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु वातावरणातील बदलामुळे मिर्चीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला.त्यामुळे विनायक मुदखेडे यांचं मोठ आर्थिक नुकसान झाले आहे.लागवड खर्च देखील आता निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.

jalgaon News : हतनूर धरणावर २७ हजार पक्ष्यांची नोंद

जळगाव वनविभाग मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे जलाशयावर विविध ठिकाणी आशियाई पाणपक्षी गणना करण्यात आली. यात १८३ प्रजातींचे तब्बल २७ हजार पक्षी आढळून आले.

हतनूर जलाशय वरील विविध पाणथळांवर जाऊन पक्षी अभ्यासक ई बर्ड या मोबाइल अॅपच्या माध्यमातून पाणपक्षी गणना केली, यात प्रामुख्याने रेड कस्टर्ड पोचार्ड, कॉमन पोचार्डा, शेंडी बदक, वैष्णव, वारकरी, तलवार बदक, कॉमन टील, कानुक, युरेशियन मूरहेन, पिवळा धोबी, यासह पक्षी मोठ्या प्रमाणावर होते. धोकाग्रस्त प्रजातींमध्ये सर्पपक्षी, नयनसरी, मोठा नयन सरी हे पाणपक्षी दिसून आले.

स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलतपात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’ यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्पुरते कागदी पास देण्यात येत असून, अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्याने त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन नाशिक

- उद्यापासून राज ठाकरे २ दिवस नाशिक दौऱ्यावर

- विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार

- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा

- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत करणार चर्चा

- नाशिक हा मनसेचा एकेकाळी राहिलाय बालेकिल्ला

- २०१२ ते २०१७ दरम्यान नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता आणि ४० नगरसेवक

- नाशिकमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचं ग्रहण लागलेल्या पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज मैदानात उतरणार

Nashik News : - इमारतीमधील पार्किंगच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

- नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरातील एका सोसायटीतील घटना

- बुधल विश्वकर्मा असं मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव

- पार्किंगच्या वादातून सोसायटीतील काही रहिवाशांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन विश्वकर्मा यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल

- पंचवटी पोलीस ठाण्यात सोसायटीच्या चेअरमनसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

nashik : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत उघड गटबाजी

- अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीत गटबाजी उघड

- राम लल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना वर्ष पूर्तीच्या निमित्ताने आज काळाराम मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन

- या संदर्भात देण्यात आलेल्या जाहिरातीत शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव वगळलं

- इतर सर्व नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचं नाव असताना अजय बोरस्ते यांचं नाव वगळल्यानं अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

- या गटबाजीची मागील लोकसभा निवडणुकीपासून सुरू होती दबक्या आवाजात चर्चा

- आज मात्र ही गटबाजी जाहिरातीतून उघड, मात्र गटबाजीबाबत दोन्ही गटाकडून मौन

छत्रपती संभाजीनगर शहरात आता २३ मजली उंच इमारत दिसणार

छत्रपती संभाजीनगर शहरात आता २३ मजली उंच इमारत दिसणार आहेत. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारती बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने शहानूरवाडी भागात तब्बल २३ मजली इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे. यापूर्वी शहरात १५ मजली उंच इमारत पडेगाव भागात उभारण्यात आली होती. आता शहानूरवाडी भागातील २३ मजली इमारतीत सर्वांत उंच ठरणार आहे. शहरात गगनचुंबी इमारती उभारती उभ्या राहाव्यात यासाठी शासनाने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार ७० मीटर उंच म्हणजे २३ मजल्यांपर्यंत इमारती उभारल्या जाऊ शकतात, मात्र आतापर्यंत १५ मजले एवढी एकच उंच इमारत बांधण्यात आलेली आहे. दहा ते बारा मजल्यांच्या इमारती अनेक भागांत झाल्या आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी दोन वर्षांपूर्वी २२ मजल्यांपर्यंतच्या इमारतींना बांधकाम परवानगी मागितली होती, पण पुढे हा प्रस्ताव बारगळला होता. आता मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात गगनचुंबी इमारती दिसून येतील.

Crime : अमरावतीत प्रवासी महिला चोरट्यांच्या टोळीला ठोकल्या बेड्या...

लहान बालकांना रडत ठेवत नागरिकांच्या भावनिकतेचा फायदा घेत महिलांच्या पर्स आणि दागिने लंपास करणाऱ्या पाच प्रवासी महिलांच्या टोळीला अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यातील दोन महिला ह्या रेकॉर्डवरच्या आरोपी असल्याचे निष्पन्न झालेय. तर अन्य महिलांची चौकशी केली जातेय... पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाचे प्रमुख आसाराम चोरमले, पीएसआय तेजल शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली

raigad : रायगडच्या शिवसेना आमदारांना सुनील तटकरे यांचा सूचक इशारा

आयुष्यभर अशाच संघर्षाला तोंड देत मी काम करत आलो, माझ्यासाठी हे फार नवीन आहे अशातला भाग नाही, परंतु आपल्या राजकीय फायद्यासाठी गेल्या 20 वर्षात माझ्यावर ज्यांनी ज्यांनी निराधार आरोप केले त्यांचं पुढं राजकारणात काय झालंय ते सर्वांनी पाहिलंय. असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये बोलताना दिला आहे. यावेळी त्यांचा रोख रायगडमधील शिवसेना आमदारांकडे होता. रायगडच्या पालक मंत्री पदावरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच विधान सभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप शिवसेना आमदारांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर तटकरे बोलत होते.

Crime : अंबरनाथमध्ये चर्चमधलं वादन साहित्य चोरलं!

अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावात बाप्टीस्ट तेलगू चर्च आहे. या चर्चमध्ये २० जानेवारी रोजी पहाटे २ अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड करून वादन साहित्य चोरलं. पियानो, ट्रम्प, एम्प्लिफायर आणि इतर वादन साहित्य असा सुमारे ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेला. अर्धवट उघड्या दारातून प्रवेश करत चोरांनी ही संधी साधली. या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रमुख एपीआय विजय काजारी, नागेश मुंडे यांच्या पथकाने या चोरट्यांना शोधून काढलं. हे दोन्ही चोर सराईत असून पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.

बुलढाण्यातील हिवरा आश्रम येथे विवेकानंद जयंती उत्सवाची महापंगतीने सांगता

स्वामी विवेकानंदाची 162 वी जयंती उत्सव बुलढाण्यातील हिवरा आश्रम येथे महापंगतीने पार पडला. यावेळी जवळपास तीन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. परम पूज्य शुकदास महाराजांनी गेल्या 55 वर्षांपासून सुरू केलेली ही परंपरा आजही सुरू आहे. या महापंगतीला महाप्रसादात 200 क्विंटल गव्हाची पुरी व 140 क्विंटल वांग्याची भाजी प्रसाद म्हणून वितरित करण्यात आला. यावेळी एकाच पंक्तीला वाढण्यासाठी 100 हुन अधिक ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात आला तर 5000 स्वयंसेवक यावेळी महाप्रसाद वितरित कण्यासाठी आपली सेवा देत होते. स्वामी विवेकानंदांचा राज्यातील सर्वात मोठा साजरा केला जाणारा जन्मोत्सव पार पडला.

दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण

दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. हो घटना सीसीटीव्हीतही कैद झालीये.

Maharashtra Live Update : उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांग्लादेशी महिलेला अटक

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गावात महालक्ष्मी चाळीत बांग्लादेशी महिला वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी,

पोलीस उप निरिक्षक प्रविण खोचरे, सचिन कुंभार, पोलीस कर्मचारी सुरेश जाधव, प्रकाश पाटील, शेखर भावेकर, मिलिंद मोरे, प्रसाद तोंडलीकर, महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे या पोलीस पथकाने सापळा रचून रुमा बिबी उर्फ सालया हाफिजुल खान हिला ताब्यात घेतलं. या महिलेला मागील चार महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय, मात्र तो फरार झाला. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांना हस्तांतरित करण्यात आलंय. आत्तापर्यंत १६ बांगलादेशी नागरिकांवर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

कल्याण बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब तातडीने हटवा!

अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचं रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आलं. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले. रस्त्याचं रुंदीकरण करताना हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही मागील १० ते १२ वर्षांपासून हे खांब रस्त्याच्या मध्येच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालकांचा खांबाला धडकून अपघात झाला असून आतापर्यंत अनेक जणांचा यात बळी गेला आहे. नुकताच अंबरनाथमधील रिक्षाचालक आरिफ शेख यांचा या खांबाला धडकून अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी हे खांबे हटवण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे महावितरण एमएमआरडीए आणि अंबरनाथ नगर पालिकेने लक्ष न दिल्याचा आरोप करत विशाल गायकवाड हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत खांब हटत नाहीत, मृत रिक्षाचालक आरिफ शेख याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचा इशारा विशाल गायकवाड यांनी दिला आहे.

सांगली.. विटयातील विषबाध विद्यार्थ्यांची संख्या पोहचली 29 वर

सांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतील विषबाधा झालेले विद्यार्थ्यांची संख्या 29 झाली आहे.यापैकी काही विद्यार्थ्यांवर उपचार करून रुग्णालयातुन सोडण्यात आले आहे,तर अजून काही विध्यार्थी हे विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट घेत चौकशी केली आहे.रुग्णालयात जाऊन उपचार घेणारया विध्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधत सदर विषबाधा प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.रविवारी रात्री विटा येथिल समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेतील मटणाच्या जेवणानंतर मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा बछडा ठार

- अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा बछडा ठार

- समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथील मुनेश्वर नगर जवळील घटना

- सकाळच्या सुमारास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिली धडक

- धडकेत वाघिणीच्या बछड्याचा जागीच मृत्यू

- खुर्सापार जंगलात वाघिणीचे तीन बछड्यासह होते वास्तव त्यापैकी एक

बछडा असल्याची माहिती

- वनविभागकडून घटनेची चौकशी सुरु

crime : जालन्यात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद,कारवाईत 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

जालन्यात जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. मुकेश उर्फ अशोक भिकाजी तरकसे रा. (कन्हैयानगर, जालना) असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नावं असून या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी मुकेश उर्फ अशोक तरकसे याने तालुका जालना पोलिस ठाणे हद्द आणि सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या 5 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपीकडून जबरी चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ठाकरेंचा शिलेदार अडचणीत

उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा कायम

दिनकर सावंत हेआज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते होते पार्टनर

काही दिवसापुर्वी दिनकर सावंत यांना हि आली होती acb ची नोटीस

दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणुन असतानाच्या टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली

रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वाॅल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने केले होते एकत्र काम

मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत याची होणार चौकशी

दिनकर सावंत यांना आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख

सकाळी ११ वाजता दिनकर सावंत एससीबी कार्यालयात हजर राहणार, साळवी कुटुंबामधील कुणी व्यक्ती सावंत यांच्या सोबत नसणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.