PM Modi To Take Holy Bath In Triveni Sangam On 5th February : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी कुंभ स्नानासाठी प्रयागराजला जाणार आहेत. परंतु शाही स्नानाच्या महत्वाच्या तारखा सोडून त्यांनी नेमका ५ फेब्रुवारी हाच दिवस का निवडला असा प्रश्न आहे. चला, जाणून घेऊया या दिवसाचे खास महत्त्व आणि मोदींनी यासाठी हा दिवस का ठरवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभ स्नानासाठी प्रयागराज येते जाणार आहेत. त्याची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्याच दिवशी दिल्लीतही निवडणुका होणार आहेत. तसेच प्रश्न असा पडतो कि, मौनी अमावस्येचे सर्वात महत्त्वाचे शाही स्नान, वसंत पंचमी व इतर महत्त्वाचे स्नान सोडून, ५ फेब्रुवारी हा दिवस कुंभस्नानासाठी का निवडला? काय आहे या दिवसाचे महत्त्व? जाणून घ्या पुढे...
काय आहे महत्त्व?५ फेब्रुवारीला माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी आहे. धार्मिक दृष्ट्या हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यादिवशी तपश्चर्या, आणि साधना करणे अतिशय पुण्याचे मानले जाते. धार्मिक कथा आणि मान्यतांनुसार, महाभारत युद्धात बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्मांनी सूर्यदेवाच्या उत्तरायण काळाची आणि शुक्ल पक्षाची प्रतीक्षा केली होती.
आणि जेव्हा ही शुभ तिथी आली, तेव्हा भीष्मांनी भगवान श्रीकृष्णासमोर आपले प्राण सोडले होते, ज्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला.
शास्त्रांनुसार, माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांचे स्मरण करावे आणि त्यांच्या नावाने जल, , अक्षता, फळे आणि फुले अर्पण करावीत. असे केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि त्या व्यक्तीलाही पुण्याचा लाभ होतो. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून माघ महिन्यातील अष्टमी तिथी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते.
हेच कारण आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाही स्नानाच्या इतर तिथींऐवजी ५ फेब्रुवारी ही तारीख प्रयागराजला जाऊन शाही स्नान घेण्यासाठी निवडली.