कॉम्प्युटर पेक्षाही वेगवान होईल तुमच्या मुलाचा मेंदू, मुलांच्या आहारात करा या पाच गोष्टींचा समावेश
GH News January 24, 2025 08:10 PM

मूल जन्मल्यानंतर प्रत्येक पालकाला आपले मूल हे हुशार असावे असे वाटते. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाची बुद्धी ही कॉम्प्युटर पेक्षाही जास्त असावी तर त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा. तुमच्या मुलांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही त्यांची बुद्धी तल्लख करू शकता. जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी ज्यामुळे मुलांचा मेंदू तल्लख होईल.

मुलांचा मेंदू तल्लख करण्यासाठी त्यांच्या आहारात करा या गोष्टींचा समावेश

अक्रोड

अक्रोडाला ब्रेन फूड असे म्हणतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे मेंदूचे कार्य सुधारू शकतात. दररोज दोन ते तीन अक्रोड खाल्ल्याने मुलांचे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते.

अंडे

अंड्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी 6 आणि बी 12 मुबलक प्रमाणात असते जे मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते. विशेषतः अंड्यातील पिवळ्या बलक मध्ये कोलीन असते. जे स्मरणशक्ती आणि मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश केल्याने मुलांना दिवसभर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

हिरव्या भाज्या

पालेभाज्यांमध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे पोषक घटक शरीराला ऊर्जा तर देतातच पण मेंदूच्या नसा ही मजबूत करतात. लहानपणापासूनच मुलांना हिरव्या भाज्या खाण्याची सवय लावा.

दही

दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात जे मेंदू आणि पोट दोन्हीसाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले टायरोसिन नावाचे अमिनो ऍसिड डोपामाईन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे मूड आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.

बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रसबेरी सारख्या फळांमध्ये भरपूर जीवनसत्वे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे मेंदूच्या पेशींना मुक्त रॅडिकल्स पासून वाचवतात आणि स्मरणशक्ती वाढवतात. मुलांच्या स्नॅक्समध्ये याचा समावेश करणे हा एक चवदार आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

जंक फूड आणि अतिरिक्त साखरेपासून मुलांचे संरक्षण करा

लहान मुलांना नियमित पाणी प्यायला द्या जेणेकरून मेंदू हायड्रेट राहील

खेळ आणि पुरेशी झोपही मेंदूसाठी महत्त्वाची आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.