Kabaddi Video: कबड्डीच्या मैदानावर फ्री स्टाईल मारामारी; रेफरीच्या निर्णयावर नाराज मुलींनी घातला राडा
esakal January 26, 2025 03:45 PM

Fight in Kabaddi Match Video Viral: प्रत्येक खेळामध्ये वाद-विवाद आणि भांडणे होतात. अगदी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील निर्णयामुळे सामने थांबलेले आपण पाहिले आहेत. पण प्रत्येक खेळाचे काही नियम असतात, त्या नियमांमध्ये राहुन आपल्याला हे खेळ खेळायचे असतात. अपांयर्सने दिलेल्या निर्णयाचा आदर राखून खेळ पुढे चालू ठेवायचा असतो. पण चक्क इथे आपल्याला अंपायर्सच नियम तोडताना पाहायला मिळत आहेl. पंजाबमध्ये एक अनोखा प्रकार पाहायला मिळला, नियम पायदळी तुडवत थेट मॅच रेफरीनेच हल्ला केला आणि दोन महिला संघांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली.

पंजाबमधील भटिंडा येथे शुक्रवारी एका आंतरविद्यापीठ स्पर्धेदरम्यान तामिळनाडूच्या महिला कबड्डीपटूंवर हल्ला झाला. मीडिया रिपोर्टनुसार, मॅच रेफरीच्या (पंच) निर्णयावर खेळाडू नाराज होते, त्यामुळे हाणामारी झाली. दरभंगा विद्यापीठाविरूद्धच्या सामन्यादरम्यान मदर तेरेसा विद्यापीठाविरुद्ध 'फाऊल अटॅक' झाल्याने वाद निर्माण झाला. खेळाडूंनी अपील केल्यानंतर सामन्याच्या रेफरींनी मदर तेरेसा संघाच्या सदस्यावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडले.

पंजाबमधील दरभंगा विद्यापीठाच्या समर्थकांनी तमिळनाडूच्या मदर तेरेसा विद्यापीठातील खेळाडडूंवर हल्ला केल्याचे ध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये विद्यार्थी एकमेकांवर खुर्च्या फेकतानाा दिसत आहेत. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हल्ल्याला दुजोरा दिला असून अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, 'खेळाडूंना किरकोळ खरचटले असून कोणतीही गंभीर दुखापत नाही.'

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, "मुली सुरक्षित आहेत आणि लवकरच राज्यात परततील. आम्हाला तक्रार मिळताच आम्ही प्रशिक्षकाला बोलावले. SDAT (तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरण) ने खेळाडूंना सुरक्षा देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. सुविधांची काळजी घेण्यासाठी आम्ही भौतिक संचालक आणि प्रशिक्षक पाठवतो आहोत."

त्याचबरोबर खेळाडू भटिंडा येथून दिल्लीला रवाना झाल्याची माहितीही स्टॅलिन यांनी दिली. ते म्हणाले, "ते दिल्ली हाऊसमध्ये खेळाडू राहतील आणि तामिळनाडूला परततील. सर्वजण सुरक्षित आहेत."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.