26 January Special Recipe: प्रजासत्ताक दिनी मुलांसाठी नाश्त्यात बनवा 'तिरंगा ब्रेड पिझ्झा', लगेच लिहून घ्या रेसिपी
esakal January 26, 2025 03:45 PM

26 January Special Recipe: प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक प्रमुख राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत झाला. जर तुम्ही या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर खास नाश्ता तयार करू शकता. तुम्ही तिरंगा पिझ्झा घरच्या घरी बनवू शकता. तिरंगा पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

'तिरंगा ब्रेड पिझ्झा' बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पांढरे ब्रेडचे तुकडे

पिझ्झा सॉस

हिरव्या रंगासाठी हिरवी शिमला मिरची  

भगव्या रंगासाठी टोमॅटो

पांढऱ्या रंगासाठी कॉटेज चीज

मोझारेला चीज आणि लिक्विड चीज

 मीठ

मिरपूड

चिली फ्लेक्स

ओरेगॅनो किंवा इटालियन मसाले

'तिरंगा ब्रेड पिझ्झा' बनवण्याची कृती

तिरंगा ब्रेड पिझ्झा बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वात आधी ब्रेड स्लाईस हलके टोस्ट करा. जेणेकरून ते कुरकुरीत होईल. प्रत्येक ब्रेड स्लाइसवर थोडा पिझ्झा सॉस लावा. यानंतर त्यावर थोडे चीज पसरवा. आता ब्रेड स्लाइसच्या एका बाजूला बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची लावा. यानंतर, ब्रेडवर चीजचे छोटे तुकडे ठेवा जेणेकरून ते मध्यभागी पांढरा रंग येईल. शेवटी, भगव्या रंगासाठी, तुम्हाला टोमॅटो ठेवा. तयार झाल्यावर, मीठ आणि मिरपूड टाका. लक्षात ठेवा या तिन्ही गोष्टी समान ठिकाणी लावा अन्यथा तिरंगा योग्य प्रकारे तयार होणार नाही. आता वरच्या ब्रेड स्लाइसवर शेवटी किसलेले चीज घाला. आता पिझ्झा ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर 10-15 मिनिटे बेक करा, जोपर्यंत चीज चांगले वितळेल. बेक झाल्यावर शेवटी त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घाला. तिरंगा ब्रेड पिझ्झा तयार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.