होस्टिंग आणि कवितांनी लाखो लोकांच्या मनात घर करणारा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे कायमच त्याच्या कामामुळे चर्चेत राहीला आहे. संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तो आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. संकर्षण कऱ्हाडे हा खूप अभ्यासू आणि त्याला साहित्याची खूप आवड आहे.
अभिनेता आणि अनेकांचा लाडका कवी कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar ) एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला संकर्षणने एक हटके कॅप्शन दिलं आहे. जे वाचून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. संकर्षणने इन्स्टाग्रामवर सचिन तेंडुलकरसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.
संकर्षण कऱ्हाडे पोस्टकाय बोलायचं …??? फक्तं अनुभवायचं …आज पुण्यात "चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली. पाहुणा कोण होता …??? साक्षात "क्रिकेटचा देव" भारतरत्नं तेंडुलकर… ५ मिनिटं शांतपणे बोलता आलं…ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला. जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला …"" असलेल्या "सचिन" सोबत २ तास मंचावरती ऊभं राहाता आलं …ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदुस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली… माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनांत आहेत त्या सांगता आल्या अजून काय पाहिजे …???
आकाशातल्या देवा आभार... तू जमिनीवरचा देव दावला
सचिन तेंडुलकर
संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकरांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. संकर्षण कऱ्हाडेची नुकतीच सचिन तेंडुलकर यांच्यासोबत भेट झाल्यामुळे तो भारावून गेला आहे.