पोटात वारंवार गॅस तयार होतोय? तज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास उपाय, जाणून घ्या
GH News February 03, 2025 03:12 PM

हल्ली अनेकजण बाहेरचे फास्ट फूड आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन करत असतात. त्यामुळे अनेकांना पोटांच्या समस्या निर्माण होतात. बराच वेळ पोट साफ न झाल्यास पोटात गॅस तयार होणे यासारख्या समस्या उद्भवतात. तसेच आजकालची खराब जीवनशैली आणि वेळेवर आहार न घेणे, अशा अडथळ्यांमुळे पोटाशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. कधीकधी लोकं पोट साफ होण्यासाठी औषध किंवा पावडरचे सेवन करू लागतात. त्यामुळे पोटामध्ये जास्त प्रमाणात औषध घेतल्यास दुष्परिणाम जाणवू लागतात.

न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल सांगतात की, पोटात गॅस किंवा अपचन होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु बराच वेळ त्याकडे दुर्लक्ष करणे पोटासाठी धोकादायक ठरू शकते. पोट स्वच्छ व साफ ठेवण्यासाठी योग्य आहाराचा अवलंब करणे खूप गरजेचं आहे. तुमच्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश केल्यास पोटाचे आरोग्य सुधारून यात गॅस होण्याच्या समस्यांपासून आराम मिळेल.

फायबरयुक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करा

तज्ज्ञांच्या मते, पोटाच्या आरोग्यासाठी फायबर अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या आहारात फायबरयुक्त फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच गॅसची समस्या असल्यास त्यांनी फायबरयुक्त पदार्थ खा. यासाठी आहारात फायबरसमृद्ध भाज्यांचा आणि फळांचा समावेश करा.

  • सफरचंद: तुम्हाला वारंवार गॅसच्या समस्या होत असल्यास सफरचंदाचे सेवन करा. करा यात भरपूर प्रमाणात फायबर असते. ते पोट साफ करण्यास मदत करतात.
  • किवी: किवीमध्ये पेक्टिन असते, जे पचनास मदत करते.
  • पालक आणि इतर पालेभाज्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि गॅस सारख्या समस्येपासून आराम मिळतो.

संपूर्ण धान्य खा

संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे तुमच्या आहारात ओट्स , ब्राऊन राईस आणि क्विनोआ सारखे संपूर्ण धान्य पोटातील गॅस दूर करण्यास मदत करतात. या धान्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते व आतड्यांसंबंधी आरोग्य देखील राखतात. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते, जे पोट साफ करते. त्यामुळे यासर्व पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.

प्रोबायोटिक्स समृद्ध असलेले पदार्थांचे सेवन करा

प्रोबायोटिक्स असलेले दही आणि ताक यासारखे पदार्थ पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात.तसेच या पदार्थांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया हे तुमच्या पोटातील आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. दह्याचे नियमित सेवन केल्याने पोट स्वच्छ राहते आणि पचनक्रिया व्यवस्थित चालते. त्यामुळे तुम्हाला गॅसच्या समस्या निर्माण होत नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.