Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरण्याचा धोका लक्षात घेता, मांगली गाव आणि त्याच्या आसपासच्या १० किमी परिसराला अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहे. याअंतर्गत, बाधित पक्ष्यांना मारले जाईल.
ALSO READ:
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरण्याचा धोका लक्षात घेता, मांगली गाव आणि त्याच्या आसपासच्या १० किमी परिसराला 'अलर्ट झोन' घोषित करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी मांगली गावात कोंबडी पक्ष्यांच्या मृत्यूनंतर पशुसंवर्धन विभागाने नमुने गोळा करून ते चाचणीसाठी पाठवले होते. या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणू H5N1 आढळून आला.चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्याअध्यक्षांनी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, मांगली, गेवरलाचक आणि जुनोनटोली भागात बाधित पक्ष्यांना मारले जाईल. तसेच, मृत पक्षी सुरक्षितपणे नष्ट केले जातील आणि उर्वरित कोंबड्यांचे खाद्य आणि अंडी देखील नष्ट केली जातील.
ALSO READ:
याशिवाय, परिसरात वाहनांच्या हालचालीवर बंदी घालण्यात आली आहे आणि पोल्ट्री, कोंबडी, अंडी, पक्ष्यांचे खाद्य आणि इतर संबंधित साहित्याची वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. बाधित कुक्कुटपालन फार्म सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅंगनेटने स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या काळात, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ५ किलोमीटरच्या परिघात असलेल्या पोल्ट्री आणि चिकन दुकाने देखील बंद राहतील.
Edited By- Dhanashri Naik