Maharashtra Political News live : थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचे त्रिवेणी संगमावर शाहीस्नान
Sarkarnama February 05, 2025 04:45 PM
Pm Modi in Maha Kumbh Prayagra : थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचे त्रीवेणी संगमावर शाहीस्नान

PM मोदींचे थोड्याच वेळात महाकुंभात शाहीस्नान. विशेष बोटीने पंतप्रधान शाहीस्नानासाठी रवाना.

Pm Modi in Maha Kumbh Prayagraj visit : PM मोदी प्रयागराज पोहोचले आहेत; विमानतळावर मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचले आहेत.थोड्याच वेळात महाकुंभात शाहीस्नान यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहतील.

Delhi Election 2025 Voting LIVE: आतापर्यंत ८.३० टक्के मतदान

दिल्ली विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ८.३० टक्के मतदान झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होईल. मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आणि त्यांचे मौल्यवान मतदान करा," असे मोदींनी म्हटलं आहे.पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या शुभेच्छा, असे त्यांनी 'X'वर म्हटलं आहे.

Satara News Live: संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या यांच्या बंगल्यावर छापा

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु आहे.

Delhi CM AAP National Convener: केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल

दिल्ली विधानसभा मतदानाला सुरवात होण्यापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला (मंगळवारी) केजरीवाल यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. कुरुक्षेत्रच्या शाहाबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. हरियाणा सरकारवर त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते

Devendra Fadnavis on Beed tour : CM फडणवीस बीड दौऱ्यावर पण धनंजय मुंडे गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहणार आहेत. त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्यामुळे ते गैरहजार राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

MHADA : 'म्हाडा'च्या 2264 घरांसाठी आज सोडत

म्हाडा'च्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज लॉटरी काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात दुपारी ही लॉटरी काढली जाणार आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज महाकुंभमेळ्यात जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभमेळ्यात जाणार आहेत. त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर ते गंगा नदीची पूजा करणार आहेत. मोदी प्रयागराजमध्ये दोन तास राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदीसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहे.

Delhi Assembly Election : विधानसभेसाठी आज दिल्लीत मतदान

दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडणार आहे. दिल्लीत यंदा आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षात प्रमुख लढत होणार आहे. तर मतदार पुन्हा एकदा केजरीवालांच्या हाती सत्ता देणार की सत्तांतर होणार याचा फैसला आज होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.