पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात पोहोचले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित आहेत.
Delhi Assembly election 2025 Live Updates: आज लोकशाहीचा सर्वात मोठा सण - आप खासदार राघव चढ्ढाआप खासदार राघव चढ्ढा म्हणाले, "आज लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे... मी दिल्लीतील प्रत्येक मतदाराला घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करतो. उज्वल भविष्यासाठी, सर्वोत्तम शिक्षण व्यवस्थेसाठी, वीज, पाणी आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर मतदान करा... घराबाहेर पडा आणि मतदान करून लोकशाहीच्या या महान उत्सवात सहभागी व्हा..."
Shirdi Live : दुहेरी हत्याकांडातील आरोपीस अटक; एलसीबी व शिर्डी पोलिसांची संयुक्त कारवाईशिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपीला एलसीबी व शिर्डी पोलिसांची संयुक्त कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे.
Pune Live : वाहन तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांकडून तीन जणांना अटकवाहन तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना केली अटक. पुण्यातील येरवडा परिसरातून तीन जणांना वाहन तोडफोड केल्याप्रकरणी केली अटक. अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर असे आरोपींची नावे.
Pune Live : पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या 19 आरओ प्लांट्सना महापालिकेडून टाळेजीबीएसचे रुग्ण वाढल्यावरपुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला महापालिकेकडून टाळं ठोकण्यात आलंय. सिंहगड रस्ता परिसरात तब्बल 19 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर, धनंजय मुंडे उपस्थित राहणार?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंकजा मुंडे, सुरेश धस उपस्थित राहणार आहेत. मात्र, यावेळी धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? याची चर्चा सुरू आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून मतदानदिल्ली विभानसभेसाठी आज मतदान होणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.
Live : कुंभ मेळाव्याला जाण्यासाठी नागपुरातून आज स्पेशल ट्रेन सुटणार- प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळाव्याला जाण्यासाठी नागपुरातून आज स्पेशल ट्रेन सुटणार आहे..
- नागपूर - दानापूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - बनारस या दोन स्पेशल रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे..
- या दोन्हीही गाड्यांच्या चार-चार फेऱ्या प्रवाशांसाठी धावणार असून यातील नागपूर - दानापूर गाडीची पहिली फेरी आज दुपारी बारा वाजता रवाना होणार आहे..
- तर लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस कुंभमेळा ट्रेन नंबर 01031 ही स्पेशल ट्रेन 5 आणि 8 फेब्रुवारीला मुंबई येथून मध्यरात्री बारा वाजता सुटणार आहे.
Live : संभाजीनगरात बिल्डरच्या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरणछत्रपती संभाजीनगर शहरात एका बिल्डरच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजता एन ४, सिडको भागात घडली.
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी बजावला मतदानाचा हक्ककालकाजी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी दिल्ली विधानसभेसाठी मतदान केल्यानंतर शाई लावलेली बोट दाखवली. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी मतदारसंघातून आपच्या उमेदवार आहेत, भाजपने या मतदारसंघातून त्यांचे माजी खासदार रमेश बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे.
भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील के. कामराज लेन येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता. आता या प्रकरणी सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. महिन्याभरापूर्वी सोलापुरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेवरून विधान केले होते. या विधानावरून राज्यात एकच गदारोळ निर्माण झाला होता. आता सोलापूरकर यांनी एक व्हिडिओ जारी करून माफी मागितली आहे.
Delhi Assembly Elections LIVE : दिल्ली विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, 699 उमेदवार रिंगणातदिल्ली विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व ७० विधानसभा मतदारसंघांमधील पात्र मतदार आज एकाच टप्प्यात मतदान करत आहेत. ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. तसेच मुख्यमंत्री आतिशी कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की, "दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होणार आहे. मी येथील मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आणि त्यांचे मौल्यवान मतदान करण्याचे आवाहन करतो. या निमित्ताने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या विशेष शुभेच्छा." असं त्यांनी म्हटलंय.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे ‘कार्निव्हल-२०२५’ या कला-सांस्कृतिक महोत्सवाचे आज, बुधवारी आयोजन केले आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता वि. स. खांडेकर भाषा भवन येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल.
Pravin Darade LIVE : महाराष्ट्रात सहकार सचिवपदी प्रवीण दराडे यांची नियुक्तीमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि पणन विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. दराडे यांची पर्यावरण विभागातून नुकतीच बदली करण्यात आली होती, मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सध्या सहकार विभागाचा अतिरिक्त कार्यभार नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे देण्यात आला होता. महायुतीचे सरकार आल्यापासून विविध अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आजही १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Delhi Assembly Election LIVE : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात आज मतदान, कोट्यवधी मतदार मतदानाचा बजावणार हक्कLatest Marathi Live Updates 5 February 2025 : दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज (ता. ५) कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडत असून, सुमारे कोट्यवधी मतदार सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) कलमांना आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि पणन विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अखेर माफी मागितली आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका आहे तर, काही भागांत थंडी कमी झालेली दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..