बीड : संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील वातावरण धगधगत आहे. या प्रकरणावरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. त्यानंतर आज सुरेश धस यांनी पुन्हा जाहीर कार्यक्रमातून अप्रत्यक्षरित्या संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं. 'मी बोललो की बीडची बदनामी होते असा आरोप होतो, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरित्या बीडमधील राजकीय नेत्यांवर भाष्य केलं.
आज मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफल साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण केले. या खुंटेफळ तलावामुळे ३० गावांमधील तब्बल ८० हजार एकर ओलिताखाली येणार आहे. २८०० कोटी रुपयांच्या महत्वकांक्षी प्रकल्पातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.