सोन्याचे चांदीचे दर: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काल सोन्याच्या दरानं आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. मात्र, आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 8667.3 रुपये प्रति ग्रॅम होता, यामध्ये आज 20 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भावही 20 रुपयांनी घसरुन 7946.3 रुपये प्रति ग्रॅम झाला. मात्र, चांदीच्या दरात कोणताही बदल दिसून आला नाही.
उत्तर भारतातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 86673 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे. तर जयपूरमध्ये 86666 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. लखनौ, चंदीगड आणि अमृतसरमध्ये सोन्याचा दर 86689 रुपये, 86682 रुपये आणि 86700 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकला गेला. त्याचवेळी चांदीचे भाव स्थिर राहिले.
सोन्या-चांदीच्या किमतींवर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव असतो. यामध्ये जागतिक मागणी, चलन विनिमय दर, व्याजदर, सरकारी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा समावेश आहे. विशेषत: यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर लक्षणीय परिणाम होतो. याशिवाय गुंतवणूकदारांची आवड आणि सणासुदीच्या काळात मागणीत झालेली वाढ यांचाही किमतींवर परिणाम होतो.
येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉलर निर्देशांक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याची मागणी वाढू शकते, त्यामुळे किमतीत सुधारणा शक्य आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..