Kumar Vishwas Attack on Kejriwal : 'त्या' निर्लज्ज माणसाबद्दल मला अजिबात सहानुभूती नाही; कुमार विश्वासांचा केजरीवालांवर हल्लाबोल
Sarkarnama February 08, 2025 08:45 PM

New Delhi, 08 February : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४७ जागा जिंकत आम आदमी पार्टीची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. दिल्लीत आपला मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आपचे निमंत्रक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभावचा सामना करावा लागला आहे. ‘आप’च्या या पराभवावर केजरीवाल आणि सिसाेदिया यांचे एकेकाळचे निकटवर्तीय कुमार विश्वास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी केजरीवाल यांची कठोर शब्दांत निर्भत्सना केली आहे.

दिल्लीतील निवडणूक निकालानंतर प्रख्यात कवी (Kumar Vishwas) म्हणाले, दिल्लीतील विजयाबाबत मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेने जो जनादेश दिला आहे, त्यामुळे भाजप दिल्लीतील लोकांसाठी काम करत निवडणूक आश्वासनांची परिपूर्ती करतील.

आम आदमी पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या निर्लज्ज माणसाबद्दल (माजी मुख्यमंत्री (Arvind Kejriwal) यांना उद्देशून) मला अजिबात सहानुभूती नाही. दिल्ली आता त्यांच्यापासून मुक्त झाली आहे. कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा उपयोग त्यांनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केला. पण आज न्याय मिळाला आहे, अशा शब्दांत कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

मनीष सिसोदिया यांच्या पराभवावर कुमार विश्वास यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जंगपुरामधून मनीष सिसोदिया हरल्याची बातमी आम्हाला मिळाली, तेव्हा राजकारणापासून कोसो दूर असलेली माझ्या पत्नीच्या डोळ्या आश्रू आले. ती अक्षरशः रडली. कारण आम्ही 30 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. अजून मनीष सिसोदिया यांनी माझ्या पत्नीला सांगितलं होतं की माझ्यात अजूनही ताकद आहे. सिसोदिया यांच्या पराभवातून जनता शिकेल.

अरविंद केजरीवाल यांना उद्देशून बोलताना विश्वास म्हणाले, अहंकाराचा पराभव होतो. ही त्यांची ईश्वरीय हार आहे. इतर राजकीय पक्ष हे आप आणि केजरीवाल यांच्या पराभवातून शिकतील आणि भविष्यात चांगले काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकऱ्या सोडून राजकाणात अनेकांचे शत्रुत्व स्वीकारले होते. या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केली होती. त्यांना दैवी कायद्याने शिक्षा झाली आहे, असेही कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.