दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी Motilal Oswal यांनी सूचवले ५ शेअर्स; मजबूत फंडामेंटल्सच्या आधारावर ७२ टक्क्यांपर्यंत परताव्याची संधी
ET Marathi February 08, 2025 11:45 PM
मुंबई : शेअर बाजारात गेला आठवडा चढ-उतारांचा होता. बजेट, अमेरिकी करवाढ, आरबीआय पतधोरण इत्यादी गोष्टी त्यात महत्वाचे ट्रिगर होते. या आठवड्यात निफ्टी ५० ने ०.३३ टक्क्यांची किरकोळ साप्ताहिक वाढ नोंदवली. बाजारातील ट्रेंड आणि भावना अजूनही कमकुवत आहेत. अशा ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ५ फंडामेंटल शेअर निवडले आहेत. यासाठी ७२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीव लक्ष्य देण्यात आले आहे. एम अँड एममोतीलाल ओसवाल यांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून M&M खरेदी करण्याची शिफारस केली असून यासाठी लक्ष्य किंमत प्रति शेअर ५,५१५ रुपये देण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी एम अँड एमचे शेअर्स ३१९७.७५ रुपयांवर बंद झाले. या किमतीवरून भविष्यात शेअरमध्ये ७२ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येऊ शकते. श्रीराम फायनान्समोतीलाल ओसवाल यांनी एनबीएफसी Shriram Finance शेअर्सची शिफारस केली असून त्यासाठी लक्ष्य किंमत ७०० रुपये आहे. ७ फेब्रुवारी रोजी श्रीराम फायनान्सचा शेअर ५५९.३० रुपयांवर बंद झाला. या किमतीवरून शेअर्समध्ये आणखी २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. मॅक्स हेल्थकेअरमोतीलाल ओसवाल यांनी हॉस्पिटल कंपनी Max Healthcare खरेदी करण्याची शिफारस केली असून लक्ष्य किंमत प्रति शेअर १,३८० रुपये देण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी मॅक्स हेल्थकेअरचा शेअर ११३९.६५ रुपयांवर बंद झाला. या किमतीवरून शेअरमध्ये आणखी २१ टक्क्यांची वाढ दिसून येऊ शकते. आयसीआयसीआय बँकब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी एका वर्षासाठी खाजगी बँक ICICI Bank शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्या १२५७.५५ रुपयांवर असून त्यासाठी लक्ष्य किंमत प्रति शेअर १,५५० रुपये देण्यात आली आहे. सध्याच्या किमतीपेक्षा शेअर्समध्ये २३ टक्क्यांचा वाढ होण्याची शक्यता आहे. जेके सिमेंटमोतीलाल ओसवाल यांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून सिमेंट कंपनी JK CEMENT शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला असून लक्ष्य किंमत प्रति शेअर ५,६३० रुपये देण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी जेके सीमेंटचा शेअर ४८८२.५० रुपयांवर बंद झाला. या किमतीवरून शेअरमध्ये आणखी १५ टक्के वाढ दिसून येऊ शकते.
(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)