मुंबई : दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. अभिनंदन कराव तेवढं कमीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं देखील मनापासून अभिनंदन. मोदीजींच्या गॅरंटी का कमाल आहे, असं बोललं तर वावगं ठरणार नाही. मोदीजींच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. २७ वर्षानंतर भाजपने हा विजय मिळाला. १० वर्षांचं दिल्लीकरांवरील आपच संकट दूर झालं आहे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या विजयावर भाष्य केलं आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले की, खोटं नरेटिव्ह पसरवन्यांना चारी मुंड्या चीत केलं. अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचार विरोधात केजरीवाल यांनी आंदोलन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. मात्र, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अनेक भ्रष्टाचार केले, घोटाळे केले, अण्णांना दूर केलं. या निवडणुकीत आत्ताच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो अर्थसंकल्प सादर केला त्याचं प्रतिबिंब उमटलं आहे. आता दिल्लीकरांवरची आबदा आणि संकट टळलं. आता डबल इंजिन सरकार मिळून काम करेन. काँग्रेसने फेक नरेटिव्ह पसरवलं म्हणून त्यांचा भोपळा फुटला नाही, असं देखील शिंदे यावेळी म्हणाले.
याचदरम्यान, शिंदे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे, ते म्हणजे, आपचे १५ विद्यमान आमदार धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढवाला तयार होते. मात्र, भाजप आणि एकाच विचाराचे असल्याने आम्ही उमेदवार दिले नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
भारताला महासत्ताकडे जाण्यापासून कोणी आता रोखू शकत नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिलं. काही लोकं म्हणतं होते ही लाट कसली पण ही महालाट आहे. ते लोकं सगळे एकत्र खुर्चीसाठी येतात, देशाच्या विकासासाठी येत नाहीत. जेव्हा कर्नाटक आणि तेलंगणा लोकसभेत त्यांना विजय मिळाला तेव्हा इव्हीएम चांगलं होतं. विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएम आणि न्यायालयावर खापर फोडलं.
महाराष्ट्र विकासाचं आणि जनतेच्या हिताचं पॅटर्न राबवत आहे. यांची सुरुवातीला भ्रष्टाचार विरोधी लढणारे अशी ओळख होती. पण त्यांनी भ्रष्टाचार घोटाळे केले. लोकांनी त्यांचा चेहरा ओळखला, असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवालांवर जोरदार निशाणा साधला.