Beed News : मळमळ आणि उलट्या; अंगणवाडीतील खिचडी खाल्ल्यानंतर १० मुलांना विषबाधा
Saam TV February 09, 2025 02:45 AM

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या माजलगवात तालुक्यात मोठी घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण फुलसिंग नगर तांडा येथे अंगणवाडीतील खाऊ खाल्ल्याने १० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. अंगणवाडीतील खाऊ खाल्ल्यानंतर तब्येत बिघडलेल्या बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. बीडच्या फुलसिंग नगर तांडा येथील अंगणवाडीत शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने १० बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगावात ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

टाकरवनजवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीत २९ बालके आहेत. त्यापैकी ७ बालके शनिवारी उपस्थित होते. या अंगणवाडीतील मुलांबरोबर शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी आले होते.

खिचडी खाऊन बालके घरी गेले. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंगणवाडीतील ७ आणि ४ जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना मळमळ व उलटी झाल्याची माहिती अंगणवाडीच्या सेविका कविता राठोड यांना कळवली. त्यानंतर सेविकेने सरपंच सुनील तर आणि उपसरपंच दयानंद बोबडे यांनी ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना दिली. त्यांनी तात्काळ ॲम्बुलन्स पाठवली. या घटनेनंतर बालकांना रुग्णालयात तात्काळ उपचार केले.

शिकणारी श्रावणी नवनाथ राठोड, संध्या लखन राठोड, पल्लवी अतुल राठोड, प्रीतम रवींद्र राठोड ,देवांश अजय राठोड, आर्यन परमेश्वर राठोड, आरव परमेश्वर राठोड ही बालकांची नावे आहेत. तसेच अक्षर लहू चव्हाण, देवांश अजय राठोड, इशिता देविदास , प्रथमेश दिलीप पवार आणि प्रांजल दिलीप पवार अशी मुलांची नावे आहे. या ठिकाणी बालकांना आणल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांनी भेट घेऊन बालकांची तपासणी केली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.