Amitabh Bachchan Post: 'आता जाण्याची वेळ आली' बिग बींच्या ट्विटमुळे चाहते चिंतेत, नक्की काय म्हणाले अमिताभ?
esakal February 08, 2025 08:45 PM

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन नेहमी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमी ते दैनदिन आयुष्यातील गोष्टीबद्दल सांगत असतात. दरम्यान अशातच अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ यांच्या ट्विटमुळे चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर 82 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी 7 फेब्रुवारी रोजी 8 वाजून 34 मिनिटांनी ट्विट केलं. ट्विट करत बिग बी यांनी 'जाण्याची वेळ आली आहे...' असं लिहिलं आहे. त्याच्या या ट्विटमुळे चाहत्यांना चिंता लांगली आहे. असं काहीही बोलू नका अश्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमागे काय रहस्य आहे?, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. परंतु अमिताभ बच्चन यांनी असं ट्विट का केलं? या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे. चाहत्यांना त्यांच्या उत्तराची अपेक्षा लागलीय.

अमिताभ बच्चन यांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा लाखोंचा चाहता वर्ग आहे. देशभरासह विदेशातही अमिताभ बच्चन यांची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या अश्या ट्विटमुळे चाहते संभ्रमात सापडले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.