आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. त्याआधी या स्पर्धेतील एकूण 8 सहभागी संघ त्यांच्या पद्धतीने सराव करत आहेत. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना हा 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तसेच पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिसदस्यीय मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 8 फेब्रुवारीला या त्रिसदस्यीय मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना जिंकत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता 10 फेब्रुवारीला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. त्याआधी टीममध्ये 2 खेळाडूंची अचानक एन्ट्री झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात 2 खेळाडूंचा मालिकेदरम्यान समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू तबरेझ शम्सी आणि वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.या दोघांना न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीच संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी हा दुखापतीमुळे या त्रिसदस्यीय मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतून आऊट झाला आहे. गेराल्डआधी एनरिच नॉर्खिया हा देखील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सोमवार 10 फेब्रुवारी, लाहोर
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बुधवार 12 फेब्रुवारी, कराची
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी दोघांना संधी
ट्राय सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), ईथन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, जूनियर डाला, वियान मुल्डर, मिहलाली म्पोंगवाना, सेनुरन मुथुसामी, गीडियन पीटर्स, मीकाएल प्रिन्स, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी आणि जेसन स्मिथ.
ट्राय सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल्यम ओरोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.