भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी कटकला झालेल्या दुसऱ्या वनडेत ४ विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही मिळाला.
रोहितने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली.
रोहितने या शतकी खेळीसह सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रमही मोडला आहे. रोहित आता भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी सलामीवीर ठरला आहे.
रोहितने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
रोहितने सलामीवीर म्हणून ३६८ डावात १५४०४ धावा केल्या आहेत. ज्यात ४४ शतकांचा समावेश आहे.
सचिनने सलामीवीर म्हणून ३४२ डावात १५३३५ धावा केल्या आहेत, ज्यात ४५ शतकांचा समावेश आहे.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे.
सेहवागने ३८८ डावात ३६ शतकांसह १५७५८ धावा सलामीला खेळताना केल्या आहेत.