rat१०p८.jpg -
२५N४४३०५
साखरपा : मुलींना स्वसंरक्षण शिकवताना दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
‘दुर्गवीर’कडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
निवे बुद्रुक शाळेत उपक्रम ; लाठीकाठीच्या साह्याने संरक्षण
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १० : दुर्गवीर प्रतिष्ठानकडून शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. आजचा काळ आणि त्यात सुरू असलेले मुलींवरील अत्याचार या विरोधात लढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. निवे बुद्रुक शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला.
आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीत मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. मुलींवर होणारे अत्याचार वाढत आहेत. देशात अद्यापही महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे महिला अजूनही पूर्णतः सुरक्षित दिसत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर आहेतच; मात्र प्रत्येकवेळी आपल्याला कुणाची मदत मिळेलच असे नाही. यावर उपाय म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्ह्यातील निवे बुद्रुक शाळेतील मुलींना स्वसंरक्षण शिबिर राबवण्यात आले. दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने AVLOCK या कंपनीच्या माध्यमातून दलित सेवा संचलित माध्यमिक आश्रमशाळा कला व विज्ञान महाविद्यालय निवे बुद्रुक या शाळेत तीनदिवसीय महिला स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले होते. अनुभवी आणि त्या क्षेत्रात एक नाव असलेले बैकर ॲकॅडमीचे सचिन बैकर आणि त्यांच्या टीमने मुलांना बेसिकपासून अॅडव्हान्स लेव्हल, गुड-बॅड टच, लाठीकाठीच्या साहाय्याने स्वत:चे संरक्षण कसे करायचे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या वेळी दलित सेवा संचलित माध्यमिक आश्रमशाळा कला व विज्ञान महाविद्यालय निवे बुद्रुक ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरीचे संस्थापक चंद्रकांत यादव, संस्था कार्यवाहक वैभव यादव, संस्था सदस्य श्रीकांत यादव, प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग पाटील, शिक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते.
------
संकटाला सामोरे जाऊ
शाळेतील मुलींनी मनापासून या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाने आम्ही भविष्यात आलेल्या संकटाला नक्कीच सामोरे जाऊ तसेच आमच्या जवळपास असणाऱ्या सर्व मैत्रिणी, मोठ्या महिला यांना या गोष्टीची कल्पना देऊन त्यांना पण मार्गदर्शन करू, असे उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले.