चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच्या पहिल्या पेपरमध्ये ऑस्ट्रेलिया नापास, 214 धावा गाठताना टाकली नांगी
GH News February 12, 2025 09:08 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता चार पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी पाच संघ आपलं नशिब वनडे मालिकेत तपासत आहेत. असं असताना ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंताजनक स्थिती दिसत आहे. पॅट कमिन्स दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्यात दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघ दुबळा झाला आहे. आता मिचेल स्टार्कनेही दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे. असं असताना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या स्थितीचा अंदाज लागला आहे. ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला 2-0 ने मात दिली. वनडे मालिकेतही तशाच कामगिरीची अपेक्षा होती. मात्र पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 214 धावांचं आव्हान गाठता आलं नाही.

श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात निराशाजन झाली. आघाडीचे चार फलंदाज अवघ्या 31 धावांवर तंबूत गेले. पण कर्णधार असलंकाने एकाकी झुंज दिली आणि य 126 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 127 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 214 धावांवर पर्यंत मजल मारली. श्रीलंकेचा संघ 46 षटकात सर्व गडी गमवून 214 धावा करू शकला आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हानही ऑस्ट्रेलियाला भारी पडलं.

श्रीलंकेने दिलेलं आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मॅथ्यू शॉर्टला तर खातंही खोलता आलं नाही. जॅक फ्रेझर मॅकगुर्क 2 धावांवर तंबूत परतला. असं करत एका पाठोपाठ एक रांग लागली. कूपर कोन्नोली 3, स्टीव्ह स्मिथ 12, मार्नस लाबुशेन 15 धावा करून बाद झाले. अलेक्स कॅरे आणि अरोन हार्डीने मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 165 धावांवर बाद झाला आणि श्रीलंकेने 49 धावांनी सामना जिंकला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, कूपर कॉनोली, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), आरोन हार्डी, शॉन अ‍ॅबॉट, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, एशान मलिंगा, असिथा फर्नांडो

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.