Donald Trump : संयुक्त राष्ट्रात ट्रम्प यांची आश्चर्यकारक भूमिका, सगळ्या जगाला धक्का, भारताने कुठला मार्ग अवलंबला?
GH News February 25, 2025 01:10 PM

रशियासोबत युद्ध सुरु होऊन 3 वर्ष पूर्ण झाली म्हणून युक्रेनने संयुक्त राष्ट्रात एक प्रस्ताव मांडला. यात रशियाच्या हल्ल्याचा निंदा करण्याचा आणि युक्रेनमधून तात्काळ रशियन सैन्य माघारीची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावावर अमेरिकेने आपल्या जुन्या धोरणांच्या विरोधात जाऊन प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. अमेरिकेच्या मतदानाने सगळ्या जगाला धक्का दिला आहे. भारत UN महासभेत या प्रस्तावावरील मतदानात सहभागीच झाला नाही. अमेरिकेने सोमावरी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील प्रस्तावावर रशियासारखच मतदान केलं. यात रशियाला आक्रमक ठरवण्यात आलेलं नाही तसच युक्रेनची क्षेत्रीय अखंडता सुद्धा मान्य केलेली नाही.

या प्रस्तावावरील मतदानात 65 देश सहभागी झाले नाहीत. यात अमेरिका, इस्रायल आणि हंगेरी या देशांनी प्रस्तावाविरोधात मतदान केलं. हा प्रस्ताव 93 मतांनी मंजूर झाला. सुरक्षा परिषदेतील पाच युरोपियन सदस्यांच्या समर्थनाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला. अमेरिका आणि रशियाची सर्वांनाच चक्रावून सोडणारी आघाडी समोर आली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनी राष्ट्रप्रमुख जेलेंस्करी यांच्यावरील शाब्दीक हल्ले वाढवले आहेत.

प्रस्तावावर अमेरिकेने काय म्हटलं ?

अमेरिकेडून UN मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला. यात रशियाचा उल्लेख नव्हता किंवा क्रेमलिनलाही आक्रमक म्हटलं नव्हतं. युक्रेनची क्षेत्रीय अखंडता सुद्धा स्वीकारली नव्हती. युद्ध लवकर संपवून युक्रेन आणि रशियामध्ये स्थायी शांततेसाठी अमेरिकेने अपील केलं आहे.

अमेरिकेच्या डिप्लोमॅट डोरोथी कॅमिली शिया म्हणाल्या की, “असे प्रस्ताव युद्ध रोखण्यात अपयशी ठरले आहेत. युद्ध खूप वाढत गेलं. युक्रेन आणि रशियासह दुसऱ्या जागांवर सुद्धा लोकांना याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे”

प्रस्तावाद्वारे काय मागणी?

तीन वर्षांपासून रशियाचा हल्ला सुरु आहे. याचा विनाशकारी प्रभाव फक्त युक्रेनच नाही जगाच्या स्थिरतेसाठी धोकादायक आहे. लाखो लोक या युद्धात मारले गेले आहेत. फक्त एकादेशावर या युद्धाचा परिणाम झालेला नाही. सगळ्या जगावर याचा परिणाम दिसून आलाय. यात दोन्ही देशात झालेल्या जिवीत आणि वित्तहानीवर शोक व्यक्त करण्यात आलाय.

युक्रेनमधून रशियन सैन्याने तात्काळ माघारी फिरावं तसच युक्रेनमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांती आणि युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाची जबाबदारी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.