Champions Trophy: 'या' कारणांमुळे रिषभ पंतला न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात मिळणार संधी?
Marathi February 26, 2025 01:24 AM

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चत केला आहे. भारतीय संघाने ग्रुप-अ च्या दोन्ही सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आणि सेमीफायनलसाठीचे तिकीट पक्के केले. आता भारतीय संघ आपला शेवटचा गट सामना (2 मार्च) रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल.

भारताच्या सेमीफायनलच्या मार्गावर शेवटच्या गट सामन्याचा काही फरक पडणार नाही. अशा परिस्थितीत, भारतीय संघ आपल्या प्लेइंग-11 मध्ये काही बदल करू शकतो. दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) संघात संधी मिळू शकते. शेवटच्या सामन्यांमध्ये पंतला प्लेइंग-11 मध्ये सातत्याने संधी मिळू शकली नाही. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या प्लेइंग-11 मध्ये त्याला संधी का मिळावी? याची मोठी कारणे आपण जाणून घेऊया.

1) डाव्या हाताच्या संयोजनात सोय असेल- भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही सामन्यांपासून वनडे आणि टी20 दोन्ही फाॅरमॅटमध्ये उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांच्या संयोजनाची रणनीती स्वीकारली आहे. या रणनीतीअंतर्गत, संघ व्यवस्थापन अष्टपैलू अक्षर पटेलला 5व्या क्रमांकावर संधी देत ​​आहे.

अशा परिस्थितीत, पंतच्या प्लेइंग-11 मध्ये येण्याचा एक मोठा फायदा म्हणजे भारताला उजव्या-डाव्या संघात दुसरा पर्याय मिळेल. त्याच वेळी, 5व्या क्रमांकावर एक योग्य फलंदाज देखील उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत पंतला न्यूझीलंडविरुद्ध संधी दिली पाहिजे.

2) हार्दिक पंड्याला विश्रांती मिळेल- भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटचा लीग सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघ आपल्या काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करू शकतो. दरम्यान स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिकला विश्रांती दिल्यास पंत संघात येऊ शकतो. कारण त्याच्याशिवायही संघात 5 गोलंदाजांचा पर्याय कायम राहील.

महत्त्वाच्या बातम्या-

सारा तेंडुलकरबाबत शुबमन गिलचं उत्तर ऐकून चाहते उत्सुक! काय आहे नक्की सत्य?
आयपीएल 2025 मध्ये टीम इंडियाबाबत बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय
“पाकिस्तानविरूद्ध विराट कोहलीने 150 शतक ठोकले असते” चाहत्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.