जॅकेट कुर्ती हा एक फॅशनेबल आणि ट्रेंडी आउटफिट पर्याय आहे. जो पारंपरिक आणि मॉडर्न फ्यूजन लूकसाठी परफेक्ट आहे. या प्रकारच्या कुर्तीमध्ये जॅकेट अटॅच्ड असते किंवा वेगळ्या पद्धतीने स्टाइल करता येते. या जॅकेटमुळे कुर्तीचा लूक अजून सुंदर आणि आकर्षक दिसतो. हल्ली या जॅकेट कुर्तीमध्ये तुम्हाला असंख्य पर्याय मिळतील. तुम्ही हे ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये देखील घेऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात कोणते स्टायलिश जॅकेट कुर्तीस आपण ट्राय करू शकतो .
हल्ली फ्लोरल पॅर्टन खूप ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच लोकांना फ्लोरल ऑउटफिट घालायला आवडतात. जर तुम्हाला फ्लोरलमध्ये काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही फ्लोरल जॅकेट कुर्ती ट्राय करू शकता. स्टायलिश लूकसाठी तुम्ही या प्रकारची फ्लोरल जॅकेट कुर्ती घालू शकता. ही कुर्ती तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकणी 8०० ते 1००० सहजपणे मिळेल.
क्रॉप किंवा कमरपर्यंतच्या जॅकेटसह येते, जी इंडो-वेस्टर्न स्टाइलसाठी उत्तम आहे.कॉलेज आणि ऑफिससाठी हा एक स्टायलिश पर्याय आहे. हे जॅकेट्स खूप स्टायलिश आणि सुंदर दिसतात.
तुम्ही लॉन्ग जॅकेट कुर्ती देखील स्टाइल करू शकता. हे कुर्तीस तुम्ही ऑफिस किंवा कॉलेज घालू शकता. हे कुर्तीस पार्टीवेअर आणि फेस्टिव्ह लुकसाठी परफेक्ट. असे कुर्तीस तुम्हाला अनेक दुकानात किंवा ऑनलाइन देखील मिळेल. या ड्रेसची किंमत साधारणपणे 1००० ते 2००० पर्यत आहे.
हैवी जॅकेट असेल तर साधी कुर्ती स्टाइल करा. जर कुर्ती डिझायनर असेल तर मिनिमल जॅकेट स्टाइल करा.
असे कुर्तीस तुम्ही प्लाझो शरारा किंवा स्कर्टसोबत पेअर करू शकता.
ट्रेंडी लूकसाठी मोठे झुमके किंवा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी उत्तम ठरतील.
हेवी वर्क असलेल्या जॅकेटसाठी न्यूड किंवा कॉन्ट्रास्ट कलरची कुर्ती निवडा.
हेही वाचा : Fashion Tips : बेल बॉटम जीन्ससाठी परफेक्ट टॉप ऑप्शन्स
द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर