Marathi Entertainment News : या नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर नुकतीच संगीतकार कुणाल भगत बरोबर लग्नबंधनात अडकली. कोकणातील वालावल गावात तिचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी तिच्या आई-वडिलांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अंकिताविषयीचा भावूक किस्सा शेअर केला.
आई वडिलांनी लोकमत फिल्मी या चॅनेलला यावेळी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लहान असताना अंकिता गंभीर आजारी असल्याची आठवण शेअर केली. अंकिताला जवळजवळ त्यांनी गमावलंच हॉट असं त्यांनी यावेळी सांगितलं.
अंकिताची आई म्हणाली कि,"अंकिताचा हा पुनर्जन्म आहे. पाच वर्षांची असताना तिच्या डोक्यात ताप गेला होता. तिला फिट्स आल्या होत्या. ती गेली असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण त्यातून ती वाचली. डॉक्टरांनी सांगितलं होतं कि, डोक्यात ताप गेलाय तर तिच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. पण तसं काही झालं नाही. त्यानंतर आम्ही तिला खूप जपलं. लहानपणापासूनच ती खूप हट्टी होती. जे तिला करायचंय ती तेच करायची."
सोशल मीडियावर अंकिताचा हा किस्सा चर्चेत आहे. अत्यंत सामान्य घरातून आलेल्या अंकिताने मेहनतीच्या जोरावर सध्या नाव कमावलं आहे. वडिलांचा रिसॉर्टचा व्यवसाय तसंच कोकणी गृहोद्योगाचा व्यवसाय ती सांभाळते आहे.
अंकिता एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर आहे. तिच्या कोकणावरील व्हिडीओमुळे तिला प्रसिद्धी मिळाली, बिग बॉस मराठी सीजन 5 मध्येही ती सहभागी झाली होती. तस शेवटच्या टॉप 5मध्येही तिचा समावेश होता.